Skip to main content

जीवनमान

टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 05/04/2021 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे हा धागा मी काढला होता. तिथल्या सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. २० सप्टेंबर २०२० ला गाडी हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन असं ठरवलं होतं पण मग म्हटलं पाचेक हजार किमी वापरानंतर लिहावा (टंकाळा, दुसरं काय!). आता लिहितोय. उशीर झाल्याबद्धल क्षमस्व. स्वतःची नवीन चारचाकी घेण्याचा पहिलाच अनुभव होता. पोटात अनेक फुलपाखरे बागडत आहेत असं उगीच वाटत होतं.

मलई

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 03/04/2021 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
महामार्गाला लागूनच असलेल्या त्या मोठ्या झोपडपट्टीत सगळं एकदम शांत होतं. हायवेवर धावणार्या जडशीळ ट्रेलरचा दणदणाट आणि त्या दिशेने भुंकणारी कुत्री यांचा आवाज सोडला तर बाकी सगळं सुमसाम. रघ्याच्या पत्र्याच्या झोपडीत मात्र रात्रीचे एक वाजले तरी साठचा बल्ब जळत होता. बाकीच्या झोपड्यातून लोकांची बत्ती केव्हाच गुल झालेली. दहा दिवसांपूर्वीच सेन्ट्रल जेलमधून बाहेर पडलेला रघ्या.! या दहा दिवसात कुठंतरी नक्कीच नजर लावून होता. कायतरी साॅल्लीड प्लान रघ्याच्या उजाड खोपडीत नक्कीच घुमत असल्याशिवाय त्याने बाकीच्या चौघांना भेटायला बोलवलेच नसते. ”खबर पक्कीये.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखक लेखनवाला यांनी बुधवार, 31/03/2021 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

तुमचे हे काय करतात?

लेखक आजी यांनी मंगळवार, 30/03/2021 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही स्त्री कुठेही जात असली, कुणाला भेटत असली, कुठंही उपस्थित असली तरी तिला एक प्रश्न हमखास विचारला जातो, किमान काही काळापूर्वीपर्यंत विचारला जायचा, तो म्हणजे "तुमचे मिस्टर काय करतात?" हा प्रश्न विचारला जातो सहज, पण जणू त्या स्त्रीची संपूर्ण "औकात" जोखण्यासाठी विचारल्यासारखा हा प्रश्न असतो. ह्या एका प्रश्नाच्या उत्तरावरुन तिचं संपूर्ण स्टेटस विचारत्याला कळतं. नवरा डाॅक्टर, इंजिनिअर असेल तर फारच उत्तम. प्रथम श्रेणी, प्रथम पसंती. "आम्ही तिकडे (यूएस, युरोप आदि) ला असतो. आत्ता इकडे इंडियात आई गेल्या म्हणून आलोय." हे उत्तर म्हणजेही उच्च दर्जा.

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 25/03/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो. माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न!

पिशाच्च वाॅक..

लेखक आजी यांनी सोमवार, 22/03/2021 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्य घटना आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका असं म्हणत नाही. विश्वास ठेवाच. त्यावेळी मी एका निमशहरात नोकरी करत होते. त्यावेळी मी आणि माझी एक मैत्रीण रोज पहाटे चांगलं चार, पाच किलोमीटर फिरुन यायचो. व्यायाम म्हणून. पहाटे पाच वाजता जायचो आणि सव्वासहा साडेसहा वाजता परत यायचो. दोघींची वयं पस्तिशीची. घरात नवरा, मुलं. एकदा अशीच मी रात्री झोपले. गाढ झोप लागली. नेहमीप्रमाणे अलार्मशिवाय जाग आली. सवयच पडलेली. बाथरुमला जाऊन आले. एक चुकार कावळा ओरडत होता. परत जरा लोळावं वाटलं, पण निग्रहाने मोह टाळला. म्हटलं, उगीच थोडक्या आळसापायी फिरण्याचा नेम मोडायला नको. पटकन उठून फिरुन येऊया. उठले. दात घासले.

भेळ..... तर फक्त निमित्त आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 21/03/2021 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा, अस्मितेसाठीच काढला आहे...धागा अराजकीय आहे... मराठी भाषा, हवी तशी वळवता येत असल्याने आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असल्याने, खूप गहनविचार न करणेच उत्तम... खूप दिवसांनी, ठाण्याला, बहिणीकडे भाऊबीजेसाठी, सगळी भावंडे जमलो होतो. मामलतदाराची मिसळ, सकाळीच खाल्ली होती. तशी मला ही मिसळ अजिबात आवडत नाही. म्हणजे, आधी आवडत होती पण, सध्या घरीच, खिमामिसळ बनवत असल्याने, आता ही शाकाहारी मिसळ खावीशी वाटत नाही. एकदा प्रयोग म्हणून, कोळंबीमिसळ पण बनवून बघीतली, पण, खिमामिसळ ती खिमामिसळच... आता संध्याकाळी काय खायचे?

ॐभवति! डोसां देहि!

लेखक आजी यांनी मंगळवार, 16/03/2021 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
भुकेवरुन आणखी एक गंमत आठवली. एम.ए.नंतर मला जर्नालिझम करायचं होतं. त्याकाळी प्रत्येक घरात फोन नसायचा. आमच्याही घरी नव्हता. माझं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. त्यामुळे मैत्रीणींचाही संपर्क राहिला नव्हता. मला जर्नालिझमची माहिती काढायची होती. प्रवेशाची प्रोसिजर समजावून घ्यायची होती. पण कशी घेणार? त्यावेळी मोबाईल, गुगल वगैरे काही नव्हतं. व्होकेशनल गायडन्सचे कोर्सेस कधी सुरू व्हायचे, कधी संपायचे कळायचं नाही. मी एका निमशहरातून पुण्यासारख्या शहरात एखाद वर्षापूर्वी आले होते. अजूनही घराबाहेर पडलं की बावचळल्यासारखं व्हायचं. जर्नालिझमची इन्स्टिट्यूट कुठं आहे हे माहीत होतं. एप्रिल महिना.

दातही होते, दाणेही होते...

लेखक आजी यांनी मंगळवार, 09/03/2021 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी रेडियोवर नोकरी करत असतानाची गोष्ट. मी माॅर्निंग ड्यूटी करत होते. मी पहाटे चार वाजता उठले. माझं आवरलं. सासूबाईंना बाय करुन आणि झोपलेल्या मुलाचं पांघरूण नीट करुन, पावणेपाचला मी माझी कायनेटिक सुरू केली. अर्ध्या रस्त्यात आले आणि लक्षात आलं की डबा घरीच राहिलाय. परत जाणं शक्य नव्हतं. साडेपाचला ट्रान्समिशन ओपन होणार होतं. त्याआधी मटेरियल चेक करायचं होतं. मी कायनेटिक चा स्पीड वाढवला आणि ऑफिसला पोहोचले. कामाला सुरुवात केली. फक्त एक कप चहा पिऊन मी घरातून निघालेली होते. खूप काम होतं. सकाळी नऊ वाजता कोपऱ्यावरच्या चहावाल्याकडून चहा आणि वडापाव मागवला. प्यून सांगत आला चहा तयार होता.