Skip to main content

जीवनमान

मी बिचारा एक म्हातारा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी बिचारा एक म्हातारा ती गेली देवाघरी आज बैसलों हसत एकटा या हास्यकट्ट्यावरी माती सरत चालली होती तरी जीव थकला नव्हता आजही थरथरत्या हातांना ओला स्पर्श हवा होता रोज यायची नटून थटुनी दिसायलाही होती बरी म्हाताऱ्याला हात पुरे तो कशाला हवी आता परी मी देखील नित्यनेमाने दात काढुनी हसायचो तिला हसताना बघून मात्र गुलाबी स्वप्नं बघायचो कधी कुलू तर कधी मनाली बेत ठरायचे मनात हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या सर्व बेत गेले मसनात ========================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

शिकून काय झाले

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यास केला पण भोकात गेला शिकून काय झाले मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही ओझे तसेच राहिले लहानपणी मी खिडकीतून मुले खेळताना बघितली हाती पुस्तक धरूनही वीतभर फाटत राहिली साहेब साहेब करूनहि माझे कल्याण नाही झाले पुस्तक माथी मारूनही माझे बालपण हरवले आज छकुला निरागसपणे अहोरात्र खेळत राहतो मी मात्र इथं कामावरती दिवसभर चोळत राहतो चोळण्यासाठी जन्म नव्हे हा हे कळतेय मजला आज स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी अंगी असावा लागतो माज ============================= सिद्धेश्वर विलास पाटणकर

कसं पटवावं पोरीला ?

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
कसं पटवावं पोरीला ? शोधत होतो लवगुरु अथक प्रयत्नांनी एक मिळाला ज्याची लफडी होती सुरु माग काढुनी भेट घेतली पण वाटला तो थकलेला प्रेमरसात तो न्हाउनी डुंबुनी असेल कदाचित पिकलेला मी पण होतो आसुसलेलो एक पोरगी पटवण्यासाठी सांगेल ते मी करणार होतो माझ्या मधल्या काठीपोटी पदस्पर्श करून मी त्याला म्हणालो मलापण प्रेम करायचंय तुमच्यावानी रुबाबात पार पोरींना घेऊन फिरायचंय ऐकून माझा उद्देश गुरुचे , हरपले सारे भान जुन्या आठवणींनी रडू कोसळले, कंठाशी आले प्राण रडू आवरून मला म्हणाला यात अवघड नसते काही वायफळ बडबड केली म्हणजे पोरी पटतात कशाही अक्कल यांची गुडघ्यात आणि दिडबुद्ध

हा 'मी' नाही, आपण आहोत.

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 03/06/2021 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
'त्या' विहीरीत दगड टाकून सभोवतालाकडे दुर्लक्ष करत त्याचे कान दगड आणि पाण्याचा मिलनध्वनी ऐकण्यासाठी सज्ज झाले. तळाच्या अंधारात काय झाले कुणास ठाऊक. पण आतून आवाज आला, "विहीर का बुजवताय?" ही वाट नवी नव्हती, पण आता तो जुना 'तो' नव्हता. बदल आणि स्थिरतेच्या वजनकाट्यावर हिंदोळणारं आयुष्य त्याला नकोसं झालेलं. केवळ दोन पारड्यांत सामावतं ते आयुष्य कसलं? आणि दरवेळी वजन तोलूनच का बघायला हवं हो? जे दिसतंय त्यातच भागवून घ्यावं की. निकष बनवणारी ही माणसंच असतील ना कुणीतरी? की ते ही कुणा 'प्रेषितचा संदेश'! मला नाही फरक पडत त्याने. नशिबाचा कपाळमोक्ष करून माझी भाग्यरेषा मीच रेखाटनार.. याच मातीत.

काय पाहायचं कळेना? हे पाहा (१) - वाईल्ड वाईल्ड कंट्री

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 31/05/2021 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
. कटाक्ष- नेटफ्लिक्स माहितीपर सहा भागांची लघू-मालिका. एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग) ओळख- नेटफ्लिक्स ची 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रजनीश तथा ओशो च्या कारकीर्दीवर आधारित एक सत्यकथा आहे. पुण्यातील रजनीश आश्रम सोडून अमेरिकेतील ओरेगोन राज्यात जवळपास 80 हजार एकर जमीन खरेदी करून तेथे उभारलेल्या अत्याधुनिक 'रजनीशपुरम' या शहराभोवती ही मालिका फिरते.

मृत्यूचा दंश

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/05/2021 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही. पण डोळसपणे बघितलं तर कळतं की, मृत्यु ही शाश्वत गोष्ट आहे.

वसंतोत्सव साजरा.

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 14/05/2021 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी पाडवा या सणाच चैतन्य म्हणजे वसंताने नटलेली सृष्टी! इवल्या इवल्या पोपटी,गुलाबीसर रंगांची चैत्र पालवी झाडांनी अंगा खांद्यांवर पांघरलेली.गुलमोहर,बहवाचे,पळसाचे लाल ,पिवळे ,केशरी असे नानविध रंगीबेरंगी तोरण बांधलेली सृष्टी !उन्हाची दार सूर्याने अर्धवट उघडली असल्याने वसंताची मंद झुळूक अनुभवता येते कारण नंतर सूर्याची ही पूर्ण उघडलेली कवाड ग्रीष्मात सृष्टीला तप्त करणार. एरवी दुर्लक्षित असणारे कडुलिंबाची फुले वापरून बनविलेला कडू प्रसाद हा आरोग्य संवर्धन करणाऱ्या अशा अनेक वनस्पती बहारलेल्या आहेत याकडे लक्षकेंद्रित वेधतात.म्हणूनच बारीकशा लिंबाच्या फुलांनी,डहाळ्याने ती गुढी अतीमोहक भासते.

आहुती ????????

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 04/05/2021 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
यज्ञास बैसलों आम्ही आहुतीचा मान घ्यावा भरा झोळी माझीच फक्त भरभराटीचा आशिष द्यावा अवकाळी पाऊस , भूकंपाची जोड त्याला घरे पडली भूकंप येता , पडल्या दगड आणि विटा त्याच चोरुनी यज्ञ मांडला आता आहुतीसाठी आटापिटा तिथे दूरवर चूल पेटली राखण करती दोन मशाली भाकरी रांधण्या तिथेच बैसली सुन्न चेहरा घेऊन माउली महत्प्रयासे पार मशाली आता राहिली फक्त माउली तिला एकदा का आडवी केली आहुतीची मग चिंता मिटली माऊलीचा भोग चढवितो जगणं आलंय जिवा क्षुब्ध व्हाल अशी आस धरितो भरभराटीचा आशिष मज द्यावा ==================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

मनोगत

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 30/04/2021 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
खिशात माझ्या घेऊनि फिरतो वादळ घोंघावते इंद्रधनू भवताली माझ्या सतरंग पसरते भावनांचा लाव्हा जिभेवर आस नाही मज कसली यमकांची मोळी बांधुनी मी विस्तवात टाकली जान्हवी जणू डोळे माझे जिथे तिथे पोहोचते अनुभवाची लाट उसळुनी मनसागरात धडकते लखलखतो तो सूर्य हाती शब्द जाळत फिरतो विसरतो मी रीत सारी आठवेल ते लिहितो कधी बरसतो मेघ सावळा थेंबे थेंबे पाणी काव्य नसे हे अव्वल मित्रा हि तर अनुभवाची कहाणी .... हि तर अनुभवांची कहाणी ................. ===================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

नशिबाची परीक्षा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 29/04/2021 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबाची परीक्षा घेतली असाच नंबर डायल केला समोरून मधुर आवाज आला हॅलो , मी बोलतेय , बोला ...