Skip to main content

जीवनमान

२. एका क्षणात विदेहत्व : इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 19/11/2020 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता किंवा सिद्ध ! जगात यापरता तिसरा पर्याय नाही. इन फॅक्ट, जर तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नसाल तर स्वतःला व्यक्ती मानण्याखेरीज इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यत्र-तत्र-सर्वत्र सिद्धत्वंच सारे विश्व व्यापून आहे त्यामुळे इथे बाय-डिफॉल्ट, प्रत्येक जण सिद्धच आहे पण एखादं-दुसराच स्वतःच्या सिद्धत्वाची घोषणा करतो हा जगातला सर्वात मोठा विस्मय आहे.

१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/11/2020 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्‍या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट ! १. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे.

उगवता "तेजस्वी" तारा

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 12/11/2020 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्रोत खरंच आज देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि नक्कीच ती उणीव आपले तेजस्वी यादव भरून काढतील. त्यांना नाही जमले तर अजुन 11 तरुण कार्यकर्त्यांची अख्खी फळीच लालू यादवांनी घरी उभी केलीये. खूप खूप उपकार आहेत या भारतभुमीवर कि एकाच घरात त्यांनी इतके तरुण कार्यकर्ते निर्माण केले. इथेच न थांबता त्यांनी स्त्रीसशक्तीकरण देखील आपल्या घरातूनच सुरु केले. पहिल्यांदा स्वतः करून दाखवायचे आणि आपल्या कृतीतून समाजाला संदेश द्यायचा या थोर विचारसरणीचे ते पाईक आहेत..

रॉकस्टार

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 11/11/2020 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

स्मृतींची चाळता पाने --अनगाव

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 11/11/2020 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग-- स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग १९४५ हे वर्ष आमच्यासाठी फार वाईट गेले. मी १९४५ मध्ये माझे वडील अल्पशा आजाराने वारले. मी तेव्हा फक्त ६ वर्षांची होते.मला माझे वडील नीटसे आठवतही नाहीत.माझी मोठी बहीण विमल तेव्हा ९ वर्षांची होती तर आई सुशिलाबाई ३० वर्षांची.

स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 08/11/2020 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो माझी आई , श्रीमती सुलेखा ना. मेहेंदळे,सध्या वय वर्षे ८१ , व्यवसाय स्मरणरंजन, फोनवर गप्पा मारणे,स्तोत्रे पोथ्या वगैरे वाचणे आणि काही प्रमाणात लिखाण करणे. तर बरेच दिवस ती लिहीत असलेल्या आठवणीमधील काही पाने मिपावर प्रकाशित करावीत असा माझा विचार चालू होता आणि तो मी तिला बोलूनही दाखविला होता. त्याप्रमाणे मी दर थोडे दिवसांनी तिला विचारत असे आणि झालेले लिखाण चाळून काही सूचना करत असे. सरतेशेवटी आजपर्यंत लिहून झालेल्या आठवणी थोड्या थोड्या प्रकाशित करूया असे ठरवून आज हा पहिला लेख लिहीत आहे. तसे म्हटले तर सामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य असे काय असणार?

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 08/11/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 05/11/2020 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ५ नोव्हेंबर हा श्री मारुती चितमपल्लि यांचा जन्मदिन तर १२नोव्हेंबर हा डॉ सलिम अलींचा.

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 24/10/2020 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

OTT वरील पाहण्याजोग्या सिरीज /चित्रपट

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 19/10/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल. SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज.