Skip to main content

जीवनमान

ते दोघं

लेखक Bhakti यांनी बुधवार, 28/04/2021 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनसाथी हा मानवी नात्यांचा सुंदर लेख वाचून मला हे दोघेच आठवले. दुपारच कळकळीत ऊन खिडकी बाहेर मोकळ्या अर्धवट बांधलेल्या प्लॉटवर वेगवेगळी झाडे झुडप उगवली आहेत.काही ओळखीचे उंबर ,बोरीच ,टनटनीच,निंबाच आणि काही अनोळखी रानटी झाड आहेत .मोकळा पडीक असूनही एक जैवविविधतने भरलेली ही जागाच आहे.माझ्या स्वयंपाक करण्याच्या रोजच्याच चक्रात करमणुकीचा टी व्ही च जणू इवल्याशा निसर्गाचा वेगवेगळा तुकडाच! वेगवेगळ्या रंगांनी नटलेली वेगवेगळी फुलपाखर दिवसभर बागडत राहतात.मेंदूच्या उजव्या बाजूला मनाशी जोडत राहतात.चिमण्या तळहातापेक्षा चिमुकल्या काही फिक्कट हिरव्या तर गर्द काळी चिमणी उन्हात चमकली की निळस

आमचीबी आंटी जन टेस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/04/2021 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 23/04/2021 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज विमलेश अर्थात् विम्मी ह्या अभिनेत्रीचं नाव फारसं कोणाला आठवणार नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि राजकुमारसोबतच्या "हमराज़" ह्या चित्रपटामधील तिच्यावर चित्रित झालेली ही गाणी आजही ऐकली- बघितली जातात आणि ह्या गाण्यांमध्ये एक हसरा चेहरा आपल्याला दिसतो.

आवाज बंद सोसायटी - भाग ४

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/04/2021 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
यामागील भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३ परिणाम ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली.

आवाज बंद सोसायटी - भाग ३

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/04/2021 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे दोन भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ व्याख्या व विकास एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात.

सिझेरिअन प्रसूती : इतिहास व दंतकथा

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 12/04/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष फाडून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते.

आवाज बंद सोसायटी - भाग २

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 11/04/2021 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग १: http://www.misalpav.com/node/48651 ::: आवाज बंद सोसायटी - भाग १ आवाज बंद सोसायटी - भाग १ विषय प्रवेश आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या ताण तणावांना सामोरे जात असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंबहूना झोपलेल्या अवस्थेत आपले मन अर्धवट जागे राहून अनेक प्रकारचे तणाव झेलत असते. जीवनात समस्या काही वैयक्तिक खाजगी तर काही सामाजीक असतात.

आवाज बंद सोसायटी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/04/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'. ध्वनी प्रदूषण तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता.

सांगली कट्टे,

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 06/04/2021 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत. मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ.

१. मिनी लॉकडाऊन : दिवस पहिला

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 06/04/2021 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
काल उद्धव ठाकरेसाहेबांनी करोनाच्या केसेस चा वाढीव आकडा पहता कडक निर्बंध आणि वीकेंडला संपुर्ण लॉकडाऊन ची घोषणा केली . #मिनीलॉकडाऊन . आज संध्याकाळपासुन आठ वाजल्यापासुन त्याची अंमलबजावणी सुरु झाली , त्या अर्थाने आज लो़कडाऊनचा पहिला दिवस. मागच्या वर्षीच्या मिपावरील लॉकडाउन स्पेशल लेखमालिकेत लेख लिहिता न आल्याची खंत मनात होतीच , ती दुर करण्याची संधी सरकारने दिली ह्यबद्दल मी सरकारचा आभारी आहे ;) ________________________________________ खरंतर लिहिण्यासारखं खुप आहे पण सगळंच अघळपघळ ... अगदी खरंच बोलायचं तर लॉकडाऊन आपल्याला काही झेपला नाही.