हा धागा, अस्मितेसाठीच काढला आहे...धागा अराजकीय आहे... मराठी भाषा, हवी तशी वळवता येत असल्याने आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असल्याने, खूप गहनविचार न करणेच उत्तम...
खूप दिवसांनी, ठाण्याला, बहिणीकडे भाऊबीजेसाठी, सगळी भावंडे जमलो होतो. मामलतदाराची मिसळ, सकाळीच खाल्ली होती.
तशी मला ही मिसळ अजिबात आवडत नाही. म्हणजे, आधी आवडत होती पण, सध्या घरीच, खिमामिसळ बनवत असल्याने, आता ही शाकाहारी मिसळ खावीशी वाटत नाही. एकदा प्रयोग म्हणून, कोळंबीमिसळ पण बनवून बघीतली, पण, खिमामिसळ ती खिमामिसळच...
आता संध्याकाळी काय खायचे? ह्यावर दुपारी 4 नंतर चर्चासत्र सुरू झाले..चर्चा करता करता, गाडी आधी उपमा, पोहे, शिरा, थालीपिठे, बटाटेवडे, भजी, इडली, डोसे, (आजकाल, इडलीडोसे, यांचे तयार पीठ मिळते..पण, आमच्या घराण्यात ते कुणालाच पसंत पडत नाही, त्यात कानडी चव नसते) असे करता करता, भेळ, हा मेन्यू फिक्स ठरला आणि भेळ खायला, तळापळीला जायचे नक्की ठरले...
वैयक्तिक सांगायचे तर, भेळ हा पदार्थ बाहेर रेडीमेड खायच्या लायकीचा नाही.भेळेची सामग्री ही घरीच बनवायची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्यात हातभार लावून मग, बागेत जाऊन खायची गोष्ट आहे. (कोजागिरीच्या रात्री मात्र, गच्चीतच खुलते...तो अपवाद असतो)
तळापळीला, एक चक्कर मारून, एके ठिकाणी भेळ खायला बसलो.मला विकतची भेळ आवडत नाही, हे आमच्या सौ.ला माहिती असल्याने, तिने सांगीतले की, तिला जास्त भूक नसल्याने ती माझ्या बरोबर भेळ खाईल.(बायकांची(च) जात जास्त चतुर असते.)
बोलता बोलता, कुठली भेळ चांगली? ह्यावर गाडी आली आणि जो तो आपल्याच गावातील भेळ कशी चांगली? हे पटवून द्यायला लागला...
भावंडे पण भरपूर असल्याने ते सगळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पसरले आहेत...
एकजण म्हणाला, भेळ खावी ती आमच्या कोल्हापुरचीच...
दुसरा म्हणाला की, आमच्या सारसबागेत भेळ चांगली मिळते
तिसरा म्हणाला, शिवाजीनगर स्टेशनला भेळ चांगली मिळते
चौथा म्हणाला, आमच्या सोलापूरला भेळ चांगली मिळते
पाचवा म्हणाला की, भेळ खावी ती नागपूरलाच
कुणी यवतमाळ, कुणी अकोला, कुणी वर्धा...
जो तो आपापले गाव घेऊन बसलेला ...
शेवटी मी इतकेच म्हणालो की, तुम्ही सगळे भेळ खायला जात होतात की हिरवळ बघायला? कारण जिथे हिरवळ जास्त तिथे भेळ किंवा इतर तत्सम पदार्थ चांगलेच लागतात....
वाचने
6739
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
असंख्य बाजू
कधीही या....
In reply to असंख्य बाजू by अनन्त्_यात्री
हिरवळ
हो ना ...
In reply to हिरवळ by चौकटराजा
चतुर तर असतात
In reply to हो ना ... by मुक्त विहारि
खिमामिसळीची पाकक्रुति पोस्ट
+१
In reply to खिमामिसळीची पाकक्रुति पोस्ट by खटपट्या
खूप सोपी पाककृती आहे...
In reply to +१ by तुषार काळभोर
ओह..
In reply to खूप सोपी पाककृती आहे... by मुक्त विहारि
तुमचं आमचं जमणारच
In reply to ओह.. by तुषार काळभोर
डोंबोलीच्या गोखले रोडवर
भेळ तर एव्हरग्रीन मेन्यू !
तुमचे लेख व भारंभार प्रतिसाद
हा .... हा .... हा .... !