Skip to main content

हे ठिकाण

फिरकी

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 26/08/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला. नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) . तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.

अवधूत (भाग-१)

लेखक मांत्रिक यांनी रविवार, 23/08/2015 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
शारद पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने सारं जग भरून गेलेलं होतं. त्या प्रकाशात तारका मात्र फार क्षीण दिसत होत्या. नेहमीच्या सरावाने त्याची पावले त्या दुधाळ प्रकाशात गडवाटेवर पडत होती. जवळपास ११ वर्षांपासूनचा परिचित रस्ता. कधीही मनात लहर येईल तेव्हा जायचं जगदंबेच्या भेटीला गड चढून. हवेत मंदसा प्रसन्न गारवा. वर्षाकाळात तरारून उगवलेल्या गवताचा आणि रानफुलांचा मादक सुगंध मात्र सगळीकडे दरवळत होता. कधी कुठे तरी एखाद्या चुकार रात्रिंचराची फडफड नाहीतर बाकी सर्व शांत शांत. मागे वळून पाहिलं तर खाली गावात घरोघरी लागलेल्या दिव्यांची नाजुकशी रांगोळी.

बाबासाहेब पुरंदरे "महाराष्ट्र भूषण" यांचे अभिनंदन

लेखक शीतल जोशी यांनी शुक्रवार, 21/08/2015 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
काही व्यक्ती या आयुष्यभर एक वेड घेऊन जगतात. त्यांचे सारे आयुष्याच जणू भारलेले असते. तसाच एक अवलिया महाराष्ट्रात जन्माला आला यांचा आम्हाला अभिमान वाटतो . तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग दोन वेळा आला आणि ऐकतानाचा योग प्रत्यक्ष एकदा आणि दूरचित्रवाणी आणि अन्य मार्गांनी अनेकदा आला. तुमच्या वाणी तून केवळ आणि केवळ राजे आमच्या समोर उभेच राहतात असे नाही पण त्या महान योद्ध्याचा आणि राजाचा, उभा जीवन पटच डोळ्या समोरून सरकत जातो. पंढरीचे भक्त ज्या भक्तिभावाने दर वर्षी वारी चालत जातात, त्याच भक्तिभावाने आपण शिवाजी महाराजांना गड किल्ल्यांवर भेटण्यासाठी जाता.

माया -३ (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी गुरुवार, 13/08/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
माया - १ माया -२ सगळ्या घरात एक उदासपणा पसरला होता . ते घर आता केविलवाणं दिसू लागलं . त्या घरातले स्मित गेले . काव्य गेले . बडबड थांबली .राजीव अगोदरच घुम्या . ती भयाण शांतता सावित्री बाईंच्या अंगावर येवू लागली . मध्ये मध्ये येणारा पोरीच्या रडण्याचाच काय तो आवाज .त्या लेकराला बराच वेळ आई ने आपल्याला घेतलं नाही हे जाणवत असावं . राजीवला काहीतरी मनात टोचत होतं. ह्या पोरीचा जन्म झाला आणि चंद्रा आपल्याला , ह्या घराला सोडून गेली असं काहीसं त्याला वाटत होतं .

माझे व्यायामाचे फ़ंडे- २

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 10/08/2015 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझे व्यायामाचे फंडे - २ (कृपया वाचकांनी लेखाच्या तांत्रिक बाबींकडे न पाहता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा, ही विनंती आहे.) आमच्याच शहरातील महानगरपालिकेच्या हॉलमध्ये ही योगासने शिकवली जात होती. योगासनासारख्या आरोग्याशी निगडित गोष्टीसाठी नेमका महानगरपालिकेचा हॉल कसा काय मिळतो कुणास ठाऊक? त्यात भरीस भर म्हणून नेमका हा योगासनाचा वर्ग भाजी मंडईत होता. तिथे असणारी स्वच्छतागॄहे खूपच अस्वच्छ होती. योगासने करताना कधी कांद्याचा तर कधी ढब्बू मिरचीचा, कधी आंब्याचा तर कधी फणसाचा.. सीझनप्रमाणे वेगवेगळे वास येत होते.

गादी - शेवट

लेखक संजय पाटिल यांनी रविवार, 09/08/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गादी - , , , चाचांचे मनोगत मागील भागापासून पुढे सुरू.... वेड्या वाकड्या झालेल्या बांगड्या हातात खेळवत खिडकीतून बाहेर शून्यात नजर लावून विचार करत बसलो होतो. कामगार काम उरकून निघून गेले होते. बेगम खाना बनवण्यात व्यस्त होती. कुणाच्या असतील बरं? कामगारानां खोदून खोदून विचारलं तरी सांगता येईन की नेमका कुठला कापूस किंवा कुठल्या गादीतून ह्या आल्या असतील.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

माया -२ (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 04/08/2015 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रा . नावाप्रमाणेच चंद्रासारखा मुखडा . का त्या मुख्ड्यावरूनच नाव ठेवलं गेलं होतं कुणास ठावूक .गव्हाळ रंग . टपोरे बोलके डोळे आणि लांब केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते . तेवढ्याच भांडवलावर तिला पहिल्यांदा पाहताच राजीव ने आपली संमती कळवून टाकली . राजीव हि चांगला देखणा होताच . बाकी कुठल्याच गोष्टीत दोघांच्यात साम्य नवतं . चंद्रा उत्साहित , बडबडी, थोडीशी बालिश तर राजीव अबोल . कामापुरतं बोलणारा . एखाद्या दिवशी हसला तर आज सुर्य कुनिकड उगवला असा प्रश्न पडायचा सावित्रीला . थोडासा तिरसटच . राजीव च्या घरची परिस्थिती चांगली होती .तर चंद्रा गरीब .

माझे व्यायामाचे फंडे -१ ,

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 03/08/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
शरीर माध्यम खलु धर्म साधनम ! असे एक संस्कृत मधील सुभाषित आहे. माणसाचे शरीर उत्तम आसेल तर ,त्याचे भवितव्य ही उज्वल असते य़ा वरील उक्ती प्रमाणे ,रोज थोडातरी व्यायाम करावा आसे मी रोज ठरवतो . रात्री झोपताना नित्यनियमाने गजर लावणे ,सर्व कपडे ,बूट याची योग्य व्यवस्था करून मगच झोपतो . मात्र नेमका गजर वाझला की माझे नियोजन पूर्ण पणे बदलून जाते .त्या उबदार पांघरुणात असे वाटते कि "जाऊ दे यार !

माया (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी शनिवार, 01/08/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येची रात्र होती . रात्रीचे ८ वाजले होते . 'काल्या' बाबा राजीव सोबत आपलं सगळं समान घेवून आला .गुढघ्यापर्यंत काळी कफनी , खाली काळी लुंगी , कमरेला कमरपट्ट्या सारखं लाल कापड बांधलेलं . खांद्याला काळ्याच कापडाची झोळी. कपाळावर काळा टिळा. डोक्याला काळं फडकं गुंडाळलेल. ह्या सगळ्याला म्याचींग असा शरीराचा रंगहि काळाच . पण डोळे मात्र कमरपट्ट्याला म्याचींग असे लाल आणि बटबटीत .त्याच्या ह्याच अवतारामुळे ज्यांना तो माहित होता ते त्याला काल्या बाबा म्हणायचे . काल्या एक तांत्रिक होता . काळ्या शक्तींची उपासना करायचा तो . काही काळ्या शक्ती आणि सिद्धी वश होत्या त्याला .