Skip to main content

हे ठिकाण

४. बोल ना रे बाबा काही...( समाप्त )

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/05/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
३. नको येवुस पोरी २. नको बोलु बाबा काही १. हरवली पोर माझी कविता नावाची ! मनोगतः शेवटी बापाच्या जाण्याने दु:खी झालेल्या लेकीचे(कवितेचे) हे काव्य ... समाजातील अश्या असंख्य दयनिय अवस्थेतील मिटल्या पापण्यात स्वप्ने दडलेल्या शेतकरी बापाचे चित्र सहज लिहिले गेले होते.. तुमच्या सर्वांचे आभार. - तुझ्या डोळ्यात बरसुन...

३. नको येवुस पोरी

लेखक गणेशा यांनी बुधवार, 13/05/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
नको बोलु बाबा काही काय सांगतील पोरी या आसवांच्या ओळी दु:खाच्या खाणीत तव स्वप्नांची होळी नको येवुस माहेराला अवकळा सारी क्षीण आहे भाव अन जीव झाला भारी सुख गेली दावणीला शब्दही फितुर झाली झोपडीच्या झरोक्यातुन रात्र टिपुस ओली उजाडलं रान सारं तिथ आठवांची धुळ माखलेल मन आज जनु पारंब्याचा पिळ नाही काही इथं सार सार संपल तुझ्या पिर्तीची ओढ बस हीच जीवन वेल - शब्दमेघ

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

टोल भैरव !!

लेखक नितिन शेंडगे यांनी मंगळवार, 14/04/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !!, आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली . मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये. हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?

जायचे आहेच तर जावेस आता ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/04/2015 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
जायचे आहेच तर जावेस आता का असे वाटेत थांबावेस आता मी तुला द्यावे असे उरले न काही तू हवे तर दु:खही न्यावेस आता ही किती तलखी जिवाची होत आहे ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल जवळ थोडे आणखी यावेस आता अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही अडथळे मोडून काढावेस आता मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ तू युगे चालून ठरवावेस आता - डॉ.सुनील अहिरराव

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी सोमवार, 16/03/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.

रघूची गोष्ट

लेखक सौन्दर्य यांनी गुरुवार, 12/03/2015 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना, सहावी किंवा सातवीत, हिंदीच्या पुस्तकात आम्हाला एक धडा होता, 'जादुके सिक्के’. त्यात एका रघु नावाच्या १० वर्षाच्या मुलाची कथा होती. एक रघु नावाचा मुलगा असतो, तो फार परोपकारी आणि स्वभावाने चांगला असतो. तो दुसर्यांना मदत करायला नेहेमी तत्पर असायचा. ह्या रघुच्या शेजारी एक आजीबाई एकट्या राहत असतात. वयाप्रमाणे त्या थकल्या-भागल्या असतात त्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणे देखील कष्टाचे झाले होते, त्यात त्यांचे डोळेही अधू होत चालले होते. रघु ह्या आजींच्या घरी नेहेमी येत जात असे, आजींची झेपतील ती कामे तो करत असे, निघताना आजी रघुला काहीतरी खाऊ देत असत.

बर्था बेंझ - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने.......

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 08/03/2015 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार हे जसे अकारण चेष्टेचा विषय झाले आहेत, त्याचप्रमाणे ‘स्त्रियांचे ड्रायव्हिंग’ हा सुद्धा एक चेष्टेचा, टवाळीचा विषय झाला आहे. गुगलवर सर्च केले असता असंख्य विनोदी विडीयो ह्या विषयावर दिसतील. परंतु जगातली सर्वात पहिली ऑटोमोबाईल, (स्वयंचलीत गाडी) ही एका स्त्रीने चालवली, आणि इतकेच नव्हे तर तिच्यामुळेच ‘ऑटोमोबाईल’ ही कल्पना नुसती रुजलीच नाही तर चांगलीच फोफावली, हे फारच कमी जणांना ठाऊक असेल.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 05/02/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..! पुढे चालू.... ======================= त्या रात्री.. मला झोप अशी नीट येतच नव्हती. मनात एकच विचार येत होता. माणूस.. हा, आधी सदाचारी असल्याचा दिसतो,आणि मग.. धर्म त्यामागून डोकावल्यासारखं का वाटतं?