Skip to main content

हे ठिकाण

मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात भानगड

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 25/10/2015 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
चटपटीत चांगलचुंगलं खाण्याचा शौक होताच. मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात एक छोटीशी टपरी टाकली. आपल्याला धंद्याची काय येवढी पडलेली नाही. जनशेवा महत्वाची. म्हणून टपरीवर पोटाला सोसेल एवढेच खा असा संदेश देणारी कार्टून्स पण लावून ठेवली. धंदा कमी झाला तरी चालेल, पण निदान लोकांनी आपल्या मालाचे निदान कौतुक तरी करावे अशी माफक अपेक्षा होती. टपरीवर केळी, शेंगादाणे, असे हौसेने मांडून ठेवले. चटमटीत मिसळ होती. म्हटले चार लोक खाऊन नाही, तरी निदान वास घेऊन कौतुक करतील. पण झाले भलतेच. टपरी उघडल्या उघडल्याच एक उनाड मुलांची टोळी समोर येऊन थडकली. म्हटले पाहुया, निदान काही घेतील.

माणसांना पालवी नाही ..

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 13/10/2015 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
चेहर्यावर टवटवी नाही वाटते,माझी छवी नाही दूरवर नुसतेच रण आहे माणसांना पालवी नाही बालकांचे अर्भकांचेही हास्य आता लाघवी नाही हाक देवाला नका मारु भाव त्याचा वाजवी नाही तू कधी येशील तेव्हा ये ही प्रतिक्षाही नवी नाही हा कुणाचा चेहरा आहे आज काही चौदवी नाही डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

धन्यवाद

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 10/10/2015 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी, खरे तर वर्षांपूर्वी,'मिसळपाव' वरील माझ्या परिचित-अपरिचित मित्रांना मी माझ्या संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला मला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादांचे विश्लेषण करुन काही महिन्यांपूर्वी मी माझा प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल नुकतीच मला पुणे विद्यापीठाकडून ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. यथावकाश या संशोधन प्रकल्पावर अधिक काही लिहिण्याचा माझा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद!

पराडकर सर ........१

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 08/10/2015 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुलंनी इतकं चपखल चितळे मास्तरांचं शब्दचित्र रंगवलय की त्यापुढे इतर कुणी लिहायचं म्हणजे…. पण पराडकर सर हे त्यापुढच्या काळातले. म्हणजे मास्तरांनंतरच्या सरांच्या पिढीतले. त्यांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा गावात दोन शाळा होत्या. एक पांढरपेशा, मुलांच्या भवितव्याबद्दल जागरूक पालकांच्या पाल्यांची, तर दुसरी साध्यासुध्या कष्टकरी समाजातील, प्रगती पुस्तकावर अंगठा उमटवणाऱ्या आईबापांच्या पोरांची. सर या दुसऱ्या शाळेत शिकवत. शिवाय क्लासदेखील घेत. सरांच्या क्लासला ही गर्दी असे, पण निम्म्याहून अधिक मुलं फुकट शिकणारी असत. तसा मी पहिल्या तीन नंबरात येणारा.

आमचा पण बिग बॉस भाग २

लेखक यमन यांनी शुक्रवार, 02/10/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
व. पू . …. ह्यांनी बहुतेक सनी लिओन चा उल्लेख "सखी "म्हणून केलाय ह्यांच्या अनुदिनी वरती ह्यांचा मनिला घातलेला आणि टक्कल पडलेला फोटो आहे . "भाई कडे बघून "आपण सारे पी. एल." असं रंजलेल्या 'गांजलेल्या पुरुषां वरती असं खास एखादं पुस्तकं लिहायला पाहिजे . असो . सखी आज सकाळीच दिसली . आमच्या पोरी असले कपडे घालत नाहीत म्हणून ह्यांच्या सारख्यांच फावत . फिक्कट लिंबू कलर ची शिफॉन साडी ;माने पर्यंत रुळणारे दाट केस .अगदी किरण सारखी . फक्त केसांवर सोन चाफ्याची कमी .अशा सौंदर्याला सुगंधाच कोंदण हवंच . हि पोरगी म्हणजे वाऱ्याची झुळूक .

आमचा पण बिग बॉस

लेखक यमन यांनी मंगळवार, 29/09/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
आणि एकदाचा मराठी साहित्तीकांचा "बिग बॉस " मधला मार्ग मोकळा झाला . त्यांच्या बरोबर सनी लिओन पण घुसणार आहे .आनंद आहे . आमच्या हाती बऱ्याच साहित्तीकांच्या अनुदिनी चे शेष हाती लागले आहेत . खास तुमच्या साठी ... जयवंत दळवी … "हि तशी उफाड्याची . आमच्या बयो सारखी . कदाचित बयो पेक्षा काकणभर जास्तीच . बजा काका असता तर तिच्या कडे बघता बघता लाळ गिळायाचीच विसरला असता . तो बयो कडे असाच बघायचा . जीभ ओठावर काढून एकटक . आजू बाजुंच्या बायका तोंडाला पदर लावून हसायच्या . पण बजा काकाला ह्याचे काहीही सोइर सुतक नव्हते . तीच्या कडे बघत मोठे फुत्कार टाकण हाच त्याचा छंद होता .

राधा कृष्ण....... जर...

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
"राधा" घननीळा, का अवेळीच तू या राधेला परत भेटला? विराण आता झाले गोकुळ जुना पुराणा कदंब वठला अता न उरली स्वप्नामधली तरल अनामिक धूसर नाती कुठे पाहसी कृष्णा मधुबन भयाण या अवसेच्या राती कालिंदीचे उदासले जळ अता लोपली त्याची खळखळ नि:शब्दाचे पिसाट वारे ठेवून फिरते उरात खळबळ अता न उरल्या काठावरच्या कुरणातिल चरणाऱ्या गायी टपोर त्यांच्या डोळ्या मधली दूर हरवली वत्सल आई तुझ्या करातील सुस्वर मुरली आठवते केवळ प्राचीनता चैतन्याचा सूर हरवूनी फक्त विराणी गाते आता सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन अता कुठे उरला राधेचा तो पूर्वीचा घननिळ मोहन?
काव्यरस

अवधूत (भाग-४)

लेखक मांत्रिक यांनी मंगळवार, 22/09/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
बैराग्यानं सल्ला देऊन बरेच दिवस लोटले होते. त्यानं त्र्यंबकेश्वरला जायचा विचार फारसा काही केला नव्हता. पण एके दिवशी मात्र त्याची इच्छा नसून देखील पावले त्र्यंबकेश्वरकडे वळली. काय घडू शकेल, ही उत्सुकता आणि कदाचित काही घडणार देखील नाही, ही निराश करणारी भावना. भर दुपारच्या वेळेस तो निघाला. हिवाळ्याचे दिवस. पण आज सूर्य फारच त्रासदायक वाटत होता. त्याच्या अंगात देखील थोडासा ताप जाणवत होता. सकाळपासून त्यानं काही खाल्लेलं सुद्धा नव्हतं. विचार करण्यातच बराचसा वेळ वाया गेलेला होता. संध्याकाळ होईतो, आभाळ चांगलंच भरून आलं. लालसर जांभळ्या रंगांचे अवकाळी पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले.

राधा कृष्ण

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी रविवार, 20/09/2015 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
अजून म्हणती फिरते राधा यमुनेच्या निर्जन काठावर अजून वाटते तिला सख्याच्या ऐकू येतिल मुरलीचे स्वर !! आणिक इकडे तीरावरती लाटा उठती सुन्या सागरी, बुडून गेली भग्न द्वारका जिथे विसर्जित शाम मुरारी!
काव्यरस

अवधूत (भाग-३)

लेखक मांत्रिक यांनी गुरुवार, 03/09/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २ नरकचतुर्दशीची पहाट. घरोघरी बायकांची धांदल उडालेली होती. अजूनही गाढ झोपेत असलेल्या पोरासोरांना रट्टे दिले जात होते. नवीन कपडे घालून थोडंसं मिरवायच्या मनःस्थितीत असलेल्या मुली उगाचच पुन्हा पुन्हा अंगणात येऊन परत घरात जात होत्या. बाप्ये लोक मात्र निवांत घोरत पडलेले होते. वातावरणात चांगलाच गारठा होता. काही तरूण मंडळींनी शेकोटी पेटवून गप्पांचा अड्डा जमवलेला होता.