Skip to main content

हे ठिकाण

गादी-४

लेखक संजय पाटिल यांनी गुरुवार, 30/07/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक छोटासा अनुभव शेअर करावा म्हणून लिहायला सुरवात केली आणि लिहिताना एवढं आठवायला लागलं की कुठे थांबावं कळेना. भाग वाढत चालल्या मुळे थोडं अपराधी वाटतय पण सगळं सांगीतल्या शिवाय रहावत पण नाही.आवडलं तर वाचा. ता.क. भाग लहान होण्याचे कारण टंकनाचा आळस हे आहे. ********************************************************************************* त्याची प्रतिक्रिया बघून मी थोडासा घाबरलो. थेट विचारून चूक तर केली नाहीना? असे वाटू लागले. समजा यांच्या कडे नसल्या तर आम्ही खोटा आळ घेतोय असं समजून हा भडकून बोलायला लागला तर काय करायचं?

गादी- ३

लेखक संजय पाटिल यांनी बुधवार, 29/07/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वाचकांचे मनापासून आभार. संपादक मंडळीने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे पण आभार मागील दोन भाग प्रकाशीत केल्या नंतर थोडा विश्वास वाढला. पण अजून टंकलेखनाची सवय नसल्या मुळे एक वाक्य टंकायला दोन ते तीन मिनिटे लागतात. त्यामुळे ठरवून सुद्धा मोठा भाग टाकायला जमले नाही. त्याबद्दल क्षमस्व. आहे ते गोड मानूण घ्याल अशी अपेक्षा. ******************************************************************************** हे सगळं ऐकून कुणाला काय बोलावं तेच सुचेना. सर्व प्रथम प्रतिक्रिया बायकोची " अहो चार तोळ्यांच्या होत्या नं?" हे ऐकून आई पुन्हा रडायला लागली. सर्वप्रथम मी स्वतः ला सावरलं.

गोषवारा

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 25/07/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा कशाला गोषवारा पाहिजे फक्त थोडासा इषारा पाहिजे माणसाला अन्न वस्त्रे खोपटे शासनाला शेतसारा पाहिजे श्वासही आहेत चोरासारखे जिंदगानीवर पहारा पाहिजे हात या राखेतही टाकेन मी पोळणारा पण निखारा पाहिजे जीव ओवाळून टाकावा असा जीव कोणी लावणारा पाहिजे घोषणांची केवढी बुजबुज इथे- देशव्यापी एक नारा पाहिजे माणके मोती हिरे सगळीकडे फक्त माती खोदणारा पाहिजे काजवे उसने किती आणायचे आपुला कोणी सितारा पाहिजे टाक तू कचरा पुरेसा अंगणी स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

गादी - २

लेखक संजय पाटिल यांनी शनिवार, 25/07/2015 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ सर्व प्रतिसादीत वाचकांचे आणी संपादक मंडळींचे आभार! लेखनाला सुरवात केली तेव्हा वाटलं होतं की फार काही मोठा किस्सा नाहीये. तेव्हा एकच किस्सा लिहून खतम करू म्हणून. पण मग लिहायला लागल्यावर कळतंय किती कठीण काम आहे ते. त्यामुळे जमेल तसे छोटे छोटे भाग टाकतोय. बहिणीकडे जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आई बॅग भरत होती. दोघेच बसने जाणार म्हणून अगदी गरजेपुरते सामान एकच बॅग भरून घेऊन जायचं असं बाबांनी बजावून सांगितल्यामुळे आईचा थोडा गोंधळ उडाला होता. त्यातच कन्येने "मी पण आत्या कडे येणार" असा हट्ट धरला होता. "अगं तुझी शाळा चुकेल ना?

गादी

लेखक संजय पाटिल यांनी शुक्रवार, 24/07/2015 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना सादर प्रणाम करून पहिलेवहिले लेखन सादर करत आहे. शुद्धलेखन व टायपिंग मिस्टेक्स समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. साधारण १०-१२ वर्षापूर्वी घडलेली घटना. त्यावेळी मी, पत्नी, दोन मुले - मुलगी व.व. ४, मुलगा व.व. ०.७५, आई आणि वडील असे सर्वजण इचलकरंजीला एकत्र राहत होतो. गेले २-३ महिने सौ व आई यांचा जुन्या गाद्या मोडून नवीन करण्याबद्दल पाठपुरावा चालू होता. आता मोडून म्हणजे काय तर गादीवाला जो असतो तो घरी येतो, जुन्या गाद्यांचे वजन करतो आणी घेऊन जातो. मग आपण त्याच्या कारखान्यात जायचं. आपल्याला हवं ते कापड सिलेक्ट करायचं. साधारण साइज व नग सांगायचे.

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 16/07/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
पहा कशी लोळते सुखाने उधारवारी अजून खस्ताच खात आहे दुकानदारी पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

मेंदू

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/07/2015 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
जे नको ते नेमका वाचाळतो मेंदू रोज वारुणीमधे बुचकाळतो मेंदू बंद कर पारायणे गीताकुराणाची देवधर्माने अता भंजाळतो मेंदू दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू तू जरा आता नवी होऊन ये दुनिये त्याच त्या जगण्यास हा कंटाळतो मेंदू जीवघेणे तू असे हासू नये राणी तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस