मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

कुंडलीने घात केला

गंगाधर मुटे ·
कुंडलीने घात केला कसा कुंडलीने असा घात केला दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला असे वाटले की शिखर गाठतो मी अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला विचारात होतो, अता झेप घ्यावी तसा पाय मागे कुणी खेचलेला खुली एकही का, इथे वाट नाही हरेक पथ येथे कुणी हडपलेला? पटू संसदेचा, तरी दांडगाई म्हणू का नये रे तुला रानहेला? दिशा दर्शवेना, मती वाढवेना कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला? "अभय" चेव यावा अता झोपल्यांना असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला गंगाधर मुटे ................................................... (वृत्त-भुजंगप्रयात)

वाटते बोलायचे राहून गेले

डॉ.कैलास ·
वाटते बोलायचे राहून गेले तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले भेटले जे,ते मला फसवून गेले हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा, पोट भरलेले,तरी खावून गेले मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा आप्त माझे पाठ मज दावून गेले माफ केले पाप ते सारे तुझे मी आसवांसमवेत जे वाहून गेले पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना, आपला झेंडा इथे लावून गेले जाहले '' कैलास '' सारे सांगुनी पण, वाटते,'' बोलायचे राहून गेले '' डॉ.कैलास गायकवाड

(हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा)

चतुरंग ·
अनिरुद्धची 'हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा' ही गजल वाचतात आमच्या विडंबनाच्या गुणसूत्रांच्या दोषाने लगेच डोके वर काढले नसते तरच नवल, ईर्षाद!

शेवटी

डॉ.कैलास ·
शेवटी वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी, पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवट

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

अनिरुद्ध अभ्यंकर ·
हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा कधीतरी झाडांची भाषा मला कळावी कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा किती खोल मी अजून जावे मनात माझ्या कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा अता एकदा संपावी काव्याची वेणा मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा

पराक्रमी असा मी : हझल

गंगाधर मुटे ·
पराक्रमी असा मी : हझल माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो आधार लेखनीला खंबीर मेज आहे सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो? प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी अंधार ही अताशा संगे मलाच नेतो उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला, तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते नावात एक धागा का अभय आढळे तो?

जीवन म्हणजे मुशायरा

अजय जोशी ·
बोचता गुलाबी गजरा फाटला मनाचा सदरा खळाळतो नेहमी जिथे असतो तेथे उथळ झरा र्‍हदय ओतले शेरातुन म्हणा बरा की म्हणा खरा शेर बनावे र्‍हदय र्‍हदय जीवन म्हणजे मुशायरा आयुष्याचा असे 'उला' नंतरचा 'सानी' मिसरा औषध घेऊ प्रेमाचे करू जरासा अहं बरा करू काळजी का तुमची? असे मरा की तसे मरा जितका हसतो मी, तितका- मनीं खोलवर असे चरा दु:ख दिलेस मला; असु दे .., तुझाच मी; नाही उपरा जरी आज ओळखते जग अजून थोडा धीर धरा - अजय जोशी, पुणे

दयाळू

सौरभ परांजपे ·
माझ्या मनाला कसा उमजून टाळू? मोग-याचा गजरा कोणत्या केसात माळू? कोणत्या युगात जन्म घेतला मी येथला हर एक पापी कनवाळू माझ्या पवित्रतेचे का मांगता पुरावे? सीतेला तुम्हीच दिलेत चितेत जळू मला भोगणारा, माझाच सखा होता कोणत्या खांद्यावर विसावून अश्रू गाळू माझ्या सहिष्णूतेला त्यांचा आक्षॆप होता त्यांतला कोणीच नव्हता इतका दयाळू

प्रश्न

सौरभ परांजपे ·
जीवंतपणी जीवाला का जाळतात प्रश्न? तिरडीवर ही मेले छळतात प्रश्न दिवसभर उत्तरे शोधून थकलो मी थडग्यात देखील साले डसतात प्रश्न चितेवर सुटकेचा निश्वास घेतला मी प्रेत जळले तरी राहतात प्रश्न माझ्या चितेची सोय मीच केली घट्ट नात्याची वीण उसवतात प्रश्न पतनाचा माझ्या ’आगाज’ मीच केला बरेचवेळा माणसाला घडवतात प्रश्न मी न केला कधी कोणास प्रश्न उगाच केविलवाणे करतात प्रश्न निरंतन संघर्षाचा ’यल्गार’ मीच केला जन्मभर पुरुन परत उरतात प्रश्न आर्थिक, कौंटुंबिक, राजकिय, सामाजिक प्रश्न सामान्य माणसाला फक्त नाडतात प्रश्न एक-एक करुन सोडवायला सारे घेतले भूमितिय पद्धतिने अचानक वाढतात प्रश्न