मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दयाळू

सौरभ परांजपे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझ्या मनाला कसा उमजून टाळू? मोग-याचा गजरा कोणत्या केसात माळू? कोणत्या युगात जन्म घेतला मी येथला हर एक पापी कनवाळू माझ्या पवित्रतेचे का मांगता पुरावे? सीतेला तुम्हीच दिलेत चितेत जळू मला भोगणारा, माझाच सखा होता कोणत्या खांद्यावर विसावून अश्रू गाळू माझ्या सहिष्णूतेला त्यांचा आक्षॆप होता त्यांतला कोणीच नव्हता इतका दयाळू

वाचने 1069 वाचनखूण प्रतिक्रिया 3

चतुरंग 02/08/2010 - 18:22
अळू, गळू, पळू, साळू अशी अजून काही यमके राहिली आहेत! ;)