शेवटी
लेखनविषय:
शेवटी
वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी
हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी
लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे
लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी
भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी
लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी
देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी,
पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी
भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा
तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी
जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे
घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवटी ?
डॉ.कैलास गायकवाड.
वाचने
1425
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
उत्तम!
मीटर फसलं आहे काही ठिकाणी म्हणून काटेकोरपणे पाहता ह्या रचनेला गझल म्हणणे कठीण.
विषय भटांच्या अनेक गझलांतून हाताळला गेला असल्याने नवीन काही नाही. रूपकेही जूनीच. असो, प्रयत्न स्तुत्य. लिहीत रहा.
पॅपिलॉन,
मीटर कुठे फसलं आहे ?कृपया नमुद कराल का?
भट साहेबांच्या गझलेचा प्रभाव काही सन्माननीय अपवाद वगळता अख्ख्या मराठी गझल जगता वर आहे..... त्यामुळे तुमचे म्हणणे मला कॉम्प्लीमेंट आहे.असो.
डॉ.कैलास
उत्तम!