भंडारदराला जेव्हा कधी जाणं झालयं प्रत्येकवेळी काहीतरी नविन विषय वळवळतो डोक्यात. मागे प्रवरा मेडिकल ट्रस्ट करिता आदिवासी आरोग्याच्या उपक्रमांची आखणी, नियोजन केले होते. त्यातले एक प्रोडक्ट होते "मोटारसायकल अॅम्ब्युलन्स". अहमदनगर जिल्ह्यात, विशेषत: भंडारदरा धरणक्षेत्रातील काही दुर्गम, अतिदुर्गम गावं जेथे रस्तेच काय पण पायवाटाही नाहीत, अशा ठिकाणच्या नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या जीवावरचे संकट टळावे, या हेतूने या मोबाईल रुग्णवाहिका प्रस्तावित केली.