Skip to main content

धोरण

सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ?

लेखक खिलजि यांनी बुधवार, 09/10/2019 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ? अरे देवेंद्रा , तुला झालंय तरी काय चुलीत गेली प्रगती सारी ठेव ती मेट्रो तुझ्याच दारी मुक्यांचा जीव तुला खाऊ वाटला काय सुधीर राव आहेत कुठं ?

आमार कोलकाता - भाग ४

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 09/10/2019 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.

आमार कोलकाता - भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 03/10/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.

आमार कोलकाता - भाग २

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 24/09/2019 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

भंडारदरा

लेखक vcdatrange यांनी रविवार, 22/09/2019 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
भंडारदराला जेव्हा कधी जाणं झालयं प्रत्येकवेळी काहीतरी नविन विषय वळवळतो डोक्यात. मागे प्रवरा मेडिकल ट्रस्ट करिता आदिवासी आरोग्याच्या उपक्रमांची आखणी, नियोजन केले होते. त्यातले एक प्रोडक्ट होते "मोटारसायकल अॅम्ब्युलन्स". अहमदनगर जिल्ह्यात, विशेषत: भंडारदरा धरणक्षेत्रातील काही दुर्गम, अतिदुर्गम गावं जेथे रस्तेच काय पण पायवाटाही नाहीत, अशा ठिकाणच्या नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या जीवावरचे संकट टळावे, या हेतूने या मोबाईल रुग्णवाहिका प्रस्तावित केली.

आमार कोलकाता - भाग १

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 18/09/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

आई बाबा आणि स्मार्ट फोन

लेखक मृणमय यांनी बुधवार, 18/09/2019 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोकं स्मार्ट फोन का घेतात त्याला वेगवेगळी करणे आहेत. तरुण पिढीला स्मार्ट फोन हातात असला कि जास्त स्मार्ट झाल्यासारखे वाटते तर जुन्या पिढीला परवडतो हेच एकमेव कारण. तो कसा वापरायचा ...त्यांच्याच भाषेत सांगायचं तर चालवायचा हे माहित नसते. माझ्या आई बाबांना व्हाट्स अँप छान चालवता येते, यु ट्यूब, व्हिडिओ कॉल छान जमतो. हि आयुधे काही तलवारबाजी आणि नेमबाजी पेक्षा कमी नाही आहेत बरंका. एरव्ही नेम बारोबर बसला कि समोरचा माणूस घायाळ होतो आता त्याच्या अगदी उलट होते. त्या छोट्याश्या की पॅड वर किती ध चे मा होत असतील म्हणून सांगू? आई आणि अश्वत्थामा ( तोच तो महाभारतात ला) ह्यांच्यात खूप साम्य आहे बरका.

संध्याकाळचा पेग ..

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 28/08/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचा पेग .. जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा .... फक्त अर्धा पाऊण तास!...

बनपाव की करवंट्या.......?

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 23/07/2019 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल चित्रपट उल्लेख केलेले बुक ऍमेझॉन वरून नक्की मागवेन राजकारणाहून पण काही अवघड आह