प्रतिमास्फोट
लेखनविषय:
लेखनप्रकार
धनंजय यांच्या चित्रावरुन मला 'गती' या प्रकारातील प्रतिमास्फोट हा चित्रणप्रकार आठवला.
या चित्रणप्रकारातले चित्र पाहताना त्या प्रतिमेचा किंबहुना विषयाचा केंद्रापसारी स्फोट होउन चित्रकण वेगाने सर्व दिशांना फाकत आहेत असा आभास निर्माण होतो आणि वेगाची जाणीव होते. चित्रणातील वस्तू (विषय) आकाशात उंच गेल्यावर बाण फुटुन सर्वत्र रंगीबेरंगी प्रकाश पसरतो तशी केंद्रापासुन बाहेर झेपावत आहे असा आभास होतो.
हे चित्रण करताना भरारीभिंग वापरावे लागते. अनावरण काल जरा वाढवुन किरण साधताच कळ दाबताना अनावरण कालावधीतच फरारीभिंगाचे नाभीय अंतर बदलावे लागते म्हणजे प्रतिमादर्शन लांबुन जवळ व जवळुन लांब करावे लागते.
- Read more about प्रतिमास्फोट
- 15 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
झुडपाच्या अगदी जवळ गेल्यावर, एका पानाच्या आड लपलेला कोष दिसला.
एका वेगळ्या तंत्राने चित्रे काढायचा हा प्रयत्न आहे. चित्रे चालत्या गाडीतून काढली आहेत, पण अनावरणकाल मुद्दामून लांब ठेवलेला आहे (१/१५ ते १/३० सेकंद). असे केल्यामुळे ज्या वस्तूकडे डोळे बघत राहात होते (आणि त्यामुळे कॅमेरा त्या वस्तूचा मागोवा घेत होता), ती वस्तू त्यातल्या त्यात स्पष्ट दिसते, बाकीच्या वस्तू मात्र खरवडलेल्या दिसतात. यामुळे चित्राला गती येते. हा तंत्राला "पॅनिंग" म्हणतात. कॅमेरा : ऑलिंपस ई-५००. केंद्रमान, अनावरणकाल, छिद्रमान वगैरे वेगवेगळे.