Skip to main content

रंगाच्या रेषा - २

लेखक प्रभो यांनी बुधवार, 27/10/2010 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
रंगांच्या रेषा वाफेवर चालणार्‍या आगगाडीने फिरून झाल्यावर आम्ही चारचाकी काढून Shenipsit State Forest ला भेट द्यायला निघालो.... रस्त्यात डाव्या हाताची झाडे हिरवी तर उजव्या हाताची रंगीबेरंगी पाहून मजा येत होती... निघाल्यापासून साधारण एक सव्वा तासात इच्छित स्थळी पोहोचलो... जंगलात थोडं आत गेल्यावर हा नजारा दिसला. जायच्या एक दिवस आधीच हा सर्व कार्यक्रम ठरल्याने २ दिवस आधीचे हवामान पाहिले नव्हतेच आम्ही..इथेही दोन दिवस आधी पाउस पडून गेल्याने बरीच पानगळती झाली होती व ढगाळ वातावरण असल्याने फार दुरवरचे रंग नीट नाही पाहता आले.. मॅक्रो मोड मधे टीपी या खालच्या फोटू वरून आईस एजची आठवण झाली.. समाप्त.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7308
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

पहिल्या काही फोटोतली रंगांची उधळण आणि माळावरचं एकच घर छान! नटक्रॅकरचा नट छान छान!

क ड क! आईसएजची आठवण झालीच! मस्त फोटु. बाकी फोटू नि वाक्यांच्या संख्येत झालेली घट बरी नाही हो द्येवा!

प्रभ्या, लेका, तुझा क्यामेर्‍यावर हात एकदम मस्त बसलाय हां! पण जरा 'एका वाक्यात उत्तरे द्या' सोडुन थोडं 'सविस्तर उत्तरे लिहा' मध्ये उतर की भौ! :)

In reply to by धमाल मुलगा

>>>>लेका, तुझा क्यामेर्‍यावर हात एकदम मस्त बसलाय हां! अगदी स्सही बोल्लास भाऊ.....! >>>>पण जरा 'एका वाक्यात उत्तरे द्या' सोडुन थोडं 'सविस्तर उत्तरे लिहा' मध्ये उतर की भौ! हेच म्हणतो ना राव....! -दिलीप बिरुटे

चांगले फोटु हाये दोन कॉफि बि केलेय परवानगि न घेता?

अजून फोटो पाहिजे होते बॉ.

फोटू मस्त! या दिवसात आपल्या आसपास अशीच सुंदर रंगीबेरंगी झाडं असतात पण रोजच्या गडबडीत त्याकडे लक्ष जात नाही. काल नेहमीच्या रस्त्यावरून जाताना परवापर्यंत हिरवं असलेलं झाड आग लागल्यासारखं पिवळं झालं होतं. ते बघण्याच्या नादात अपघात होताहोता वाचले असेच म्हणीन. ड्राईव्ह करताना एकाही झाडाकडं बघणार नाही असं ठरवून टाकलय. प्रभोची व माझी नेहमी शाब्दीक मारामारी चाललेली असते त्यामुळे एकॉर्न बघितल्यावर आईसएजमध्ये मी आणि प्रभोची मारामारी चाललिये असे क्षणभर वाटून गेले.;)

लै झ्याक फटू प्रभ्याजीराव! मेल्या, अजूण लाव की फटू! इथेपण कंजूसपणा करणार का? बाकी श्री. धमाल मुलगा आणि श्री. मेघवेडा यांच्याशी अगदीच सहमत!! आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! :D --असुर

सही रे प्रभो :)

फारच आवडला. थोड्या वेळाने माझ्या मोबाईलने काढलेले फोटो टाकीन.

In reply to by निखिल देशपांडे

अरे तो सविस्तर लिहिल तेंव्हा लिहिल! आधी आभार मान म्हणावं!;) धाग्यावर येउन दोन तीन वेळा बघून गेले अजून आभाराचा शब्द नाही!

नयनरम्य ! प्रभ्या 'लिहिता' हो रे भाड्या. आणि ते देखील जमणार नसेल, तर इथे फुटकल कौल फोडत बसतात त्यांच्याकडून फोटोवर २/४ ओळी लिहुन घेत जा आणी खाली त्यांचे नाव देत जा. म्हणजे तुझीपण सोय होईल आणि त्यांचा पण लेखनकंडु शमेल.