एक मासा : सुदैवी की दुर्दैवी?
सध्या औरंगाबाद-वेरूळची जी प्रवासवर्णन मालिका लिहितो आहे त्या प्रवासात एक क्वचित आढळणारी गोष्ट बघितली, अंध मासा.
सकाळी लवकर पुण्याहून निघून दुपारी जेवायच्या वेळी औरंगाबादला पोहोचलो. कडकडून भूक लागली होती. शहरात शिरल्या-शिरल्या जे पहिले हॉटेल लागेल त्यात जेवून घेऊया असे ठरले. शहरात आल्यावर एक सुप्रिया नावाचे हॉटेल दिसले. ते कसे असेल ह्याची जरा चाचपणी करायला आत शिरलो माझ्या धाकट्याला घेऊन. आत भिंतींवर मोठे मोठे फिश टॅन्क्स होते, भिंतींवर म्हणजे भिंतींत कंसील्ड असलेले. माझ्या धाकट्या मुलाचा मासे हा वीक पॉंईंट आहे. लगेच त्याची ऑर्डर आली, 'इथेच जेवायचे' आणि तो एका टेबलावर जाऊन बसलाही.
मिसळपाव

निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला.