मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंगांच्या रेषा - ३

प्रभो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रंगांच्या रेषा रंगांच्या रेषा - २ गेल्या विकांती फॉल कलर्स बघायला व्हाईट माउंटन्स, न्यु हँपशायर इथे गेलो होतो. आमच्या इथून साधारण ३५० मैलाच्या अंतरावर आहे हे ठिकाण. पहिल्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला पोहोचून रेल्वेने (माउंट वॉशिंग्टन कॉग रेल्वे) माउंट वॉशिंग्टन या अमेरिकन उत्तरपुर्वेच्या सर्वात उंच शिखरावर जायचे ठरवले होते. पण शिखरावर जोरदार वारा चालू असल्याने वरपर्यंत जायला बंदी होती. रेल्वे ३/४ उंचीपर्यंत जाऊन परत येणार असे सांगण्यात आहे. त्याचे काही फोटो. बेस स्टेशन बेस स्टेशन वरून दिसणारे माउंट वॉशिंग्टन सुर्यदेवांचा लपंडाव बेस स्टेशनवरील एक इमारत या ठिकाणचे एक जुने रेल्वे इंजिन दुसर्‍या दिवशी जवळच्याच फ्रँकोनिया नॉच स्टेट पार्क मधे जाऊन फॉल टिपला. तसेच कॅनन माऊंटन या डोंगरावर ट्रामवेने जाऊन दर्‍याखोर्‍यांची दृष्ये नजरेत टिपली. त्याबद्दल पुढच्या भागात. :)

वाचने 4259 वाचनखूण प्रतिक्रिया 27

In reply to by यकु

गणपा 20/10/2011 - 14:44
यशवंतराव, एक चित्र १००० शब्दांचे काम करते यावर प्रभ्याचा ठाम विश्वास आहे. मग धारा बोटे आणि मोजा किती शब्द टंकलेत ते. ;)

चतुरंग 19/10/2011 - 21:12
दोन वर्षापूर्वी फॉल कलर्स बघायला गेलेलो आठवले. तुला जायला एखाद दोन आठवडे उशीर झालेला दिसतो बरीचशी पानगळ होऊन गेलेली आहे. नाहीतर आणखीन मनोहारी रंगांची उधळण मिळाली असती..

अनामिक 19/10/2011 - 21:28
मी एका विकांतापुर्वी (८ तारखेला) इथेच आणि माउंट वॉशिगटन या दोन्ही ठिकाणी जाऊन आलो. त्यावेळी शरद ऋतूतले रंग अगदी भरात येत होते. शिवाय माउंट वॉशिंगटनला ड्राईव्ह करत वर पर्यंत जाता आले. रस्ता अगदीच अरुंद असल्याने आणि बरीच वर्दळ असल्याने जरा कसरत झाली. वर गेल्यावर वारा जरा जास्तंच जोरात होता. अगदी उडून जातो की काय असे वाटण्या इतपत! रंगाशेट म्हणतात तशीच मनोहारी रंगांची उधळन पहायला मिळाली!

पैसा 19/10/2011 - 22:42
यापुढे प्रभोच्या लेखनाला "चित्रांकन"म्हणावं ही माझी सूचना. यावेळचे फोटो इतके छान आहेत की सोबतच्या अदृश्य मजकुराबद्दल माफी देण्यात येत आहे.

नंदन 19/10/2011 - 23:23
फोटो आवडले. आता दक्षिणेकडच्या राज्यांत सरकले असतील ना फॉल कलर्स?

अमोल केळकर 20/10/2011 - 10:08
मस्तच :) अमोल केळकर

इरसाल 20/10/2011 - 11:15
अत्युत्तम फोटो. अवांतर: तुम्ही जे जुने इंजिन म्हणत आहात त्याचे पुढचे चाक रोड रोलर सारखे का आहे या बद्दल काही माहिती देवू शकाल का ?

मिसळलेला काव्यप्रेमी 20/10/2011 - 11:41
मस्त फटू आहेत सगळे. ते फोटो बघून काही आठवणी जाग्या झाल्या.. असो.

मदनबाण 20/10/2011 - 14:21
अरे लोबो...एक आगाऊपणाचा सल्ला द्यायची खाज आली आहे मला...;) तू या साईटला अधुन मधुन वेळ मिळेल तशी भेट देत जा.... http://www.boston.com/bigpicture/ मी या साईटवर अधुन मधुन जात असतो..नुसते काढलेले फोटो पाहुन देखील बरेच काही शिकायला मिळते... आपल्याला काय दिसते या पेक्षा आपल्याला दुसर्‍यांना काय दाखवायचे आणि कसे यावर विचार केलास ( मी करण्याचा प्रयत्न करतोय अजुन) तर अजुन फायदा मिळेल... तुझा सुर्यदेवाचा लपंडाव हा प्रकार माझ्या मनात बरेच दिवस आहे.... आत्ताच या साईट वर Scenes from Kashmir नावाचे फोटो आहेत त्यातला पहिला फोट जमल्यास नक्की पहा. :)

प्राजु 20/10/2011 - 20:57
आम्हिही गेलो होतो... ८ - ९ च्या विकांताला.. तिथेच. व्हरमाँट ही पाहिले.. चीज फॅक्टरी पाहिली. बेन एन्ड जेरी पाहिलं.. माझे आमचे फोटो.. पिकासावर आहेत. लिंकवते. प्रायव्हेट आहे लिंक सध्या.. पब्लिक करते .

सर्वसाक्षी 20/10/2011 - 22:06
सुरेख चित्रण. मजा आली. रंगसंगती झकास

चित्रा 21/10/2011 - 00:59
मस्त फोटो. आम्ही लहानशी ट्रीप केली यंदा. फार लांब नाही.