स्वसंरक्षणासाठी फुलपाखराची युक्ती
|| श्री गुरवे नम: ||
फुलपाखराचे कोष
एकदा असेच निसर्गभ्रमंतीला गेलो होतो. सकाळची वेळ. वाटेत एका उपाहारगृहात चहा-न्याहारीसाठी थांबलो. निसर्गप्रेमी शोधक नजर सभोवती भिरभिरत होतीच. जवळच एक रुईचं झुडूप दिसलं. त्याची बरीचशी पानं कुरतडलेली होती. फुलपाखराने या झुडपावर नक्कीच अंडी घातली असणार. त्याच्या अळ्यांनी पानांचा फराळ केला असणार.
झुडपाच्या अगदी जवळ गेल्यावर, एका पानाच्या आड लपलेला कोष दिसला. त्याच्या मागे एक रिकामा फाटका कोषही दिसला, काही दिवसांपूर्वीच त्यातून फुलपाखरू उडून गेलं असणार.
थोडासा शोध घेतल्यावर दुसऱ्या एका पानाआड लपलेला आणखी एक कोष दिसला. या कोषातल्या फुलपाखराची वाढ पूर्ण झाली आहे. त्याचं आवरण पारदर्शक झालेलं दिसतंय. त्यातून फुलपाखराचे रंगीत पंखही दिसतायंत. म्हणजे थोड्या वेळानं (किंवा दुसऱ्या दिवशी) त्यातून फुलपाखराचा जन्म होईल असं वाटतं.
प्लेन टायगर, स्ट्राईप्ड टायगर या जातीची फुलपाखरं रुईच्याच झाडावर अंडी घालतात. याचं एक खास कारण आहे. रुईच्या पानामध्ये एक अतिशय कडवट आणि विषारी अल्कलॉइड असतं. अंड्यातून बाहेर आल्यावर खादाड अळ्या ही पानं फस्त करतात, त्याबरोबर हे विषारी अल्कलॉइडही त्यांच्या पोटात जातं. त्यातलं अल्कलॉइड सहन करण्याची क्षमता अळ्यांमधे विकसित झाल्यामुळे त्याचा विषारी परिणाम अळ्यांवर होत नाही. ते अळ्यांच्या शरीरात तसंच साठून राहातं. नंतर अळीचं रुपांतर कोषामध्ये होऊन काही दिवसानंतर त्यातून फुलपाखरू बाहेर येतं. या सर्व अवस्थांतरामध्ये विषारी कडवट रसायन त्याच्या शरीरात तसंच राहातं.
या ‘विषारी कडवट’ फुलपाखराला एखाद्या भक्षकानं खाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला खूप त्रास होतो. म्हणूनच भक्षक त्याच्या नादी लागत नाहीत. ही फुलपाखरं विषारी, कडवट आहेत हे भक्षकांना ओळखता यावं, यासाठी या जातीच्या फुलपाखरांचे रंगही भडक (इशारा देणारे) असतात. त्यामुळे ही फुलपाखरं बिनधास्त उडत असतात.
या युक्तीचा फायदा काही इतर जातीची फुलपाखरंही करून घेतात. विषारी नसलेली डॅनिड एग फ्लाय या जातीच्या फुलपाखराची मादी अगदी हुबेहूब टायगरसारखी दिसते. त्यामुळे भक्षक तिला विषारी समजतात आणि तिच्यापासून लांबच राहतात. या प्रकाराला ‘बेटेशियन नक्कल (Betesian mimicry)’ म्हणतात.
निसर्गाची ही नवलाई अजबच आहे, नाही का ?

वाचने
15303
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
डॅनाईड एगफ्लाय आणि स्ट्राईप्ड
In reply to डॅनाईड एगफ्लाय आणि स्ट्राईप्ड by गवि
गवि, तुम्ही नक्की कुठल्या
In reply to गवि, तुम्ही नक्की कुठल्या by विश्वनाथ मेहेंदळे
पेट्रोलियम उद्योग, मसाज,
In reply to पेट्रोलियम उद्योग, मसाज, by गवि
तीनेक लाख विषय राहिलेत हात घालण्याचे...
In reply to गवि, तुम्ही नक्की कुठल्या by विश्वनाथ मेहेंदळे
+१
लेख आवडला , गवि मस्त
मस्त..!
लेखन माहितीपूर्ण. तुम्ही आणि
छान माहिती
In reply to छान माहिती by पैसा
+१
In reply to +१ by विकास
लोकहो. फुलपाखरांचा छंद मला
मस्त
In reply to मस्त by प्रचेतस
हेच टाइपतो झालं, अवांतर -
In reply to मस्त by प्रचेतस
धन्यवाद
सुधांशू खुप सुंदर माहीती.
In reply to सुधांशू खुप सुंदर माहीती. by जागु
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
सुधांशूजी खुप रंगतदार माहीती
In reply to सुधांशूजी खुप रंगतदार माहीती by भिंगरी
भारतात तरी कढीपत्त्यावर
In reply to भारतात तरी कढीपत्त्यावर by गवि
नूलकरसरांचा धागा हायजॅक
In reply to नूलकरसरांचा धागा हायजॅक by गवि
नाही, सॉरी म्हणू नका
छान माहिती दिली आहे :)
मस्त माहीती, छान लेख
नूलकरसाहेब, तुमच्या
असंच म्हणतो