मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

प्रतिमास्फोट

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
धनंजय यांच्या चित्रावरुन मला 'गती' या प्रकारातील प्रतिमास्फोट हा चित्रणप्रकार आठवला. या चित्रणप्रकारातले चित्र पाहताना त्या प्रतिमेचा किंबहुना विषयाचा केंद्रापसारी स्फोट होउन चित्रकण वेगाने सर्व दिशांना फाकत आहेत असा आभास निर्माण होतो आणि वेगाची जाणीव होते. चित्रणातील वस्तू (विषय) आकाशात उंच गेल्यावर बाण फुटुन सर्वत्र रंगीबेरंगी प्रकाश पसरतो तशी केंद्रापासुन बाहेर झेपावत आहे असा आभास होतो. हे चित्रण करताना भरारीभिंग वापरावे लागते. अनावरण काल जरा वाढवुन किरण साधताच कळ दाबताना अनावरण कालावधीतच फरारीभिंगाचे नाभीय अंतर बदलावे लागते म्हणजे प्रतिमादर्शन लांबुन जवळ व जवळुन लांब करावे लागते.

स्वसंरक्षणासाठी फुलपाखराची युक्ती

सुधांशुनूलकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
|| श्री गुरवे नम: || फुलपाखराचे कोष एकदा असेच निसर्गभ्रमंतीला गेलो होतो. सकाळची वेळ. वाटेत एका उपाहारगृहात चहा-न्याहारीसाठी थांबलो. निसर्गप्रेमी शोधक नजर सभोवती भिरभिरत होतीच. जवळच एक रुईचं झुडूप दिसलं. त्याची बरीचशी पानं कुरतडलेली होती. फुलपाखराने या झुडपावर नक्कीच अंडी घातली असणार. त्याच्या अळ्यांनी पानांचा फराळ केला असणार. झुडपाच्या अगदी जवळ गेल्यावर, एका पानाच्या आड लपलेला कोष दिसला.

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"

सुहास झेले ·
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल. http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा.

अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातील रंगीबेरंगी हेमंत

धनंजय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही चित्रे अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातल्या रंगीबेरंगी हेमंताची आहेत. एका वेगळ्या तंत्राने चित्रे काढायचा हा प्रयत्न आहे. चित्रे चालत्या गाडीतून काढली आहेत, पण अनावरणकाल मुद्दामून लांब ठेवलेला आहे (१/१५ ते १/३० सेकंद). असे केल्यामुळे ज्या वस्तूकडे डोळे बघत राहात होते (आणि त्यामुळे कॅमेरा त्या वस्तूचा मागोवा घेत होता), ती वस्तू त्यातल्या त्यात स्पष्ट दिसते, बाकीच्या वस्तू मात्र खरवडलेल्या दिसतात. यामुळे चित्राला गती येते. हा तंत्राला "पॅनिंग" म्हणतात. कॅमेरा : ऑलिंपस ई-५००. केंद्रमान, अनावरणकाल, छिद्रमान वगैरे वेगवेगळे.

एक रम्य संध्याकाळ!!

मोहनराव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो!! मी इथे (संकेतस्थळावर) खुप दिवस असलो तरी आज लिहीता झालो. हा माझा पहिला धागा आहे. तरी कृपया सांभाळुन घेणे ही विनंती. तर एका रम्य परंतु थंड अशा रविवार संध्याकाळी रुमवर आराम करत पडलो होतो. इकडचा (जर्मनी) उन्हाळा संपुन फॉल (मराठीत शब्द माहित नाही... पानगळती का?) चालु झालाय. थंडी चालु झाल्यामुळे बाहेर जास्त पडावेसे वाटत नाही. पण थोडेसे ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडले होते. तसेही इकडचे लोक थोडेसे जरी सुर्याचे दर्शन झाले की बाहेर पडायला उत्सुक असतात. आपल्याला त्याचे जास्त कौतुक नाही. पण शेवटी लोळण्याचापण कंटाळा आला...मग पडलो बाहेर कॅमेरा काढुन.

रंगांच्या रेषा - ३

प्रभो ·
लेखनप्रकार
रंगांच्या रेषा रंगांच्या रेषा - २ गेल्या विकांती फॉल कलर्स बघायला व्हाईट माउंटन्स, न्यु हँपशायर इथे गेलो होतो. आमच्या इथून साधारण ३५० मैलाच्या अंतरावर आहे हे ठिकाण. पहिल्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला पोहोचून रेल्वेने (माउंट वॉशिंग्टन कॉग रेल्वे) माउंट वॉशिंग्टन या अमेरिकन उत्तरपुर्वेच्या सर्वात उंच शिखरावर जायचे ठरवले होते. पण शिखरावर जोरदार वारा चालू असल्याने वरपर्यंत जायला बंदी होती. रेल्वे ३/४ उंचीपर्यंत जाऊन परत येणार असे सांगण्यात आहे.

माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११

कौन्तेय ·
माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११ रामराम! सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद! मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.

कावळा, कडी आणि कॅमेरा

प्रास ·
मुंबईसारख्या महानगरात राहिल्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणजे इथे मानव प्राण्याखेरिज इतर प्राणी आणि पक्षी सृष्टी अगदीच मर्यादित प्रमाणात बघायला मिळते. शेवटी खरी प्राणी-पक्षी सृष्टी सिमेंटच्या जंगलात थोडीच पहायला मिळणार आहे? पण असं असलं तरी थोडासाच का होईना, इथे आपल्याही भोवताली, छोट्यासा निसर्गाचा एखादा तुकडा उपलब्ध असतोच. गरज असते फक्त तो शोधण्याची. काही वेळेला असंही होतं, हा निसर्ग, त्याच्या एखाद्या घटकाच्या माध्यमातून अगदी आपल्या घरापर्यंत येऊन बसतो आणि एक प्रकारे आपल्याला त्याची दखल घ्यायला भाग पाडतो. गेल्या रविवारी अशाच एका गोष्टीचा मी साक्षीदार झालो.