मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

पुन्हा एकदा

jaypal ·
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल मनमुराद रडाव वाटत ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत जळेल सारी वस्ती म्हणुन ठसका काढुन उठाव लागत मग काय? आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल fsdfs

चार ओळी मनापासुन...

हर्षद आनंदी ·
लेखनविषय:
दूर कोठेतरी कोण तो छेडी मारवा साद आर्त घालुनी आठवितो प्रियेला ओढ वेडी का अशी लागते जीवाला चांदण्यांच्या फेरयात चंद्र शोधतो कुणाला??

४ चारोळ्या

sur_nair ·
लेखनविषय:
आताशा डोळ्यात आषाढमेघ येऊन वसलाय मनात मात्र माझ्या वैशाखवणवा पेटलाय ********* तुझी जागा मनामध्ये अपुरीच राहिली फुल खुडलेल्या देठाला का कधी पुन्हा कळी आली? ********* प्रत्येकाच्या कपाळी म्हणे भाग्य लिहिलेलं असतं आठ्या पाडून म्हणूनच ते चुरगळायचं नसतं ********* माणसे तशीच राहतात युग फक्त सरते महाभारतातली द्रौपदी कलियुगातही झुरते सुरेश नायर https://sites.google.com/site/surmalhar/

मन.....

स्पंदन ·
लेखनविषय:
मूसळधार पावसात..... अंग चिंब चिंब भिजले भिजलेल्या अंगातील..... मन मात्र तहाणलेलेच राहीले. ~ स्पंदन ~

!! चारोळ्या !!

मराठमोळा ·
लेखनविषय:
हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा.. तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो.. ******************* चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली चिमणा व्याकुळतेने तडफड्ला चिमणी शोधुनही नाही मिळाली मग चिमण्यानेही प्राण सोडला.. आपला मराठमोळा

नॉनसेन्स!

अरुंधती ·
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

माझा चारोळी संग्रह (२२ चारोळ्या)

निमिष सोनार ·
लेखनविषय:
(मी आत्तापर्यंत लिहिलेल्या २२ चारोळ्या मिसळपाव च्या वाचकांसाठी देत आहे! ) ------------------------------------------------------- (१) गुढीवाडव्याच्या शुभेच्छा "चैत्र महिन्याशी करूया पुन्हा मैत्र... नव्या वर्षाचे रंगवूया सुखद चित्र...

~ गुढीपाडवा ~

निमिष सोनार ·
लेखनविषय:
काव्यरस
चैत्र महिन्याशी करूया पुन्हा मैत्र... नव्या वर्षाचे रंगवूया सुखद चित्र... सर्वांना गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा... --- निमिष सोनार, पुणे

साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

प्रसाद ·
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत. तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती! [तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...