Skip to main content

चारोळ्या

तीन चारोळ्या

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 14/03/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
१. पाण्यात पाय टाकून हसली तू लोभसवाणे कातळवेडे पक्षी दिसतात किती जीवघेणे . . २. डोळ्यात तुझ्या आभाळ किती रंगबावरे झाले जल भरुन संध्याकाळी पापण्यात थेंबही आले . . ३. पाण्यात लव्हाळे न्हाती थरथरते काया ओली हातात हात घालून हळूवार फुलेही भिजली . .

'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!!

लेखक लक्ष्मणसुत यांनी शनिवार, 28/02/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मणसुत उवाच् विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || 'विज्ञाना'मुळेच आपण झालो 'मिपाकर' | अन् 'सरपंच' झाले 'तात्या अभ्यंकर' || विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Taxonomy upgrade extras

'मिपाभूषण'

लेखक लक्ष्मणसुत यांनी शुक्रवार, 27/02/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
येथे नित्य नविन ते लिहावे | 'विरंगुळीत' प्रत्येका करावे || काथ्या कुटावा वा घालावा वाद | पण रोजच टंकावे || त्यातून निवडावा (तात्यांनी) एक 'मिपाभूषण'| त्यासी देऊन पुरस्कार (शालजोडीतून) करावा सन्मान || विचार व्हावा म्हणे लक्ष्मणसुत | असे आमुचे विनम्र आवाहन ||
Taxonomy upgrade extras

चारोळी

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 25/02/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक फोटो आहे,एका सदाफुलीच्या पाकळीवर पाण्याचा(दवबि॑दु) थे॑ब आहे.त्यासाठी मला आपल्याकडुन चारोळ्या हव्या आहेत. बि॑बातुनी प्रतिबि॑ब दिसतसे | दवबि॑दुतुनी मोती | सदाफुलीच्या स्मितहास्यातुनी | अशी उमलली प्रिती | जयेश माधव
Taxonomy upgrade extras

आई

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 16/02/2009 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आई फ़क्त एक शब्द नाही .... एक भावना पवित्र आहे .. आई मधेच "आ"र्तता अणि आई मधेच "ई"श्वर आहे .

पण तू मात्र - 2

लेखक sanjubaba यांनी गुरुवार, 05/02/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
1) देवाला मी सांगितले आणू नको कुणावरही ही वेळ..... मांडू नको आयुष्याचा तू पुन्हा असा खेळ...... 2) मी करतो साजरा उत्सव माझ्या हृदयातील दु:खाचा..... मी तर जगेल कसबसा प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा....... 3) आज सारे विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू कधी खरे प्रेम करशील कुणावर...... 4) तेव्हा सागर किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा..... किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात लपता........ 5) जर जायचेच होते आयुष्यातून तर जीवनात का आलिस.... राख भरली स रांगोळीत आणि रंग घेऊन गेलिस....... 6) सगळे काही संपवले मी पण त्याआधी तूच संपवले होते..... मनातले ओठांवर आलेच नाही तू सारे काही लपवले होत
Taxonomy upgrade extras

चारोळ्या

लेखक मानसी मनोजजोशी यांनी सोमवार, 26/01/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी कविता वाचून जीवन जगायची रित कळली दु:खावर मात करायची आता मला सवय लागली. नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव.

चारोळ्या

लेखक मानसी मनोजजोशी यांनी सोमवार, 26/01/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
सोनपिवळ्या सकाळी सारेच मिळवितात हात घनघोर अन्धारात मात्र सावलिहि सोडते साथ. सागराला भरती येते ना चन्द्राला पाहून तसच होत मला तूझ्या विचारात असताना तूला पाहुन

पण तू मात्र.........

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 17/01/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
1) कसे करू माफ़ तुला जे घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच मला दिले...... 2) तू भातुकलीच्या खेळामधली मी राजा खरा " खुळा"...... सखे, तू माझा प्रेमात केसा ने कापला गळा...... 3) तू सर्व काही दिलेस पण उत्तर दिले नाहीस...... प्रश्न बनू न राहिलिस जीवनात प्रश्न सोडवलेस नाहीस....... 4)चूक तुझी नाही दोष नशीबाचा असेल...... जीव ओवळुन टाकल्या वरही कुणि आपले होत नसेल....... ५)स्वप्न देउन कुणाच्या मुठित ती पूर्ण करायला शिकायचे......... जीवनात एक दा तरी फक्त ख-या प्रेमासाठिच जगायचे..........
Taxonomy upgrade extras

चारोळी

लेखक मॅन्ड्रेक यांनी गुरुवार, 08/01/2009 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटते वटवाघुळ व्हावे अन झाडाला लटकावे, जरी जग हे चाललेले उलटे दिसु लागेल सुलटे . क्ष..
Taxonomy upgrade extras