एके काळी शुद्धलेखन फाट्यावर मारले जायचे. आता काळ बदलला असल्यामुळे, अनुस्वारांच्या उपयोगा विषयी माहिती देत आहे. ज्यांना शुद्धलेखनात स्वारस्य आहे आणि अनुस्वाराच्या वापरासाठी प्रश्न पडत असेल, अशांसाठीच हा लेख आहे.
अनुस्वाराचा उच्चार न आणि म युक्त होत असतो.
अनुस्वाराच्या पुढचे व्यंजन त्या त्या गोत्रातले असेल, तेव्हाच अनुस्वार न देता, त्या पुढच्या सगोत्र व्यंजनाशी अनुस्वाराचे मिलन होऊ शकते. अन्यथा असा विजोड गोत्र विवाह मराठीत मान्य नाही. परंतू माझ्या माहितीनुसार, न आणि म ने सगोत्र विवाह केलाच पाहिजे असे बंधन नाही!