दुपारचे जेवण करून पुस्तक वाचायला घेतले. वाचता वाचता डोळा लागला ,इतक्यात लँडलाईनचा फोन खणाणला. घरातील सगळे गाढ झोपले होते, मी फोन उचलला.मीXXX कंपनीकडून मनाली बोलतेय, आमच्या कंपनीने एक सर्वे केला त्यात तुमच्या फोनचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलाय. मी श्री. XXXX गोडसेंशी बोलू शकते का? समोरून बोलणार्या मुलीचा आवाज इतका मंजूळ होता , की क्षणभर वाटलं खोटं बोलून संभाषण तसंच चालू ठेवावं , परंतु मी तसं करू शकलो नाही. आजोबा झोपले आहेत, थोड्या वेळाने फोन कराल का ? असं मी म्हटल्यावर घाईघाईने तिने, तसं काही नाही तुमाच्याशी बोलू शकते, असं म्हणून तिने विचारले तुम्ही सध्या काय करता?