मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्थकारण

ब्रम्हचार्‍याचा संसार. भाग १

मार्मिक गोडसे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुपारचे जेवण करून पुस्तक वाचायला घेतले. वाचता वाचता डोळा लागला ,इतक्यात लँडलाईनचा फोन खणाणला. घरातील सगळे गाढ झोपले होते, मी फोन उचलला.मीXXX कंपनीकडून मनाली बोलतेय, आमच्या कंपनीने एक सर्वे केला त्यात तुमच्या फोनचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलाय. मी श्री. XXXX गोडसेंशी बोलू शकते का? समोरून बोलणार्‍या मुलीचा आवाज इतका मंजूळ होता , की क्षणभर वाटलं खोटं बोलून संभाषण तसंच चालू ठेवावं , परंतु मी तसं करू शकलो नाही. आजोबा झोपले आहेत, थोड्या वेळाने फोन कराल का ? असं मी म्हटल्यावर घाईघाईने तिने, तसं काही नाही तुमाच्याशी बोलू शकते, असं म्हणून तिने विचारले तुम्ही सध्या काय करता?

भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनप्रकार
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी. मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.

नोटबंदीचे अभंग

भारी समर्थ ·
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

डिस्कोपोन्या ·
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

अबोली२१५ ·
लेखनप्रकार
त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४

अबोली२१५ ·
या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;) काही काही ऑफिस मध्ये सॅलरी स्लिप देत नाहीत त्या काही ऑफिस मधल माझं ऑफिस आहे.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३

अबोली२१५ ·
लेखनप्रकार
मोदींची घोषणा केली आणि इकडे मी लोन कस करायचं याचाच विचार करत होती. मी ऑफिस मध्ये काय कारण द्याच आणि कि जेणे करून मला ऑफिस मधून लोनसाठी आवश्यक पेपर देतील. मी एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलली या दरम्यान माझा नवरा घरी आला होता आणि मी त्याला या मीटिंग बद्दल सांगितलं. पहिले त्याने मला सांगितलं कि यापेक्षा तू स्वतःच चालू कर या ३. ५०लाखात तुझ स्वतःच आस्सेट्स असतील ज्या तुला दिसतील कॉम्पुटर खुर्ची टेबले वैगरे आणि जर तुझा व्यवसाय बंद झाला तर तू हे सगळं विकून काही प्रमाणात पैसे परत मिळवू शकतेस, पण ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्यावर मी कसा विश्वास ठेऊ... बरोबरच होत त्याच पण मला करायचच होतच.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २

अबोली२१५ ·
लेखनप्रकार
त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी

अबोली२१५ ·
आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी माझ्या जवळच्या मैत्रीण ती एका बिझनेस मध्ये आहे. मला हि त्या बद्दल जरा कुतूहल वाटलं म्हणून ती काय बिझनेस करते ते विचारलं यावर तिने मला ती ऑनलाईन बिझनेस पोर्टल वर बिझनेस करते. यावर मी माझी काही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांनी बिझनेस ट्रिप करता दुबई ला गेली. त्यानंतर ती मला फोन करायला लागली या वर मी बोलता बोलता सांगितलं कि मला जॉब स्विच कराचा आहे.