Skip to main content

अर्थकारण

आर्थिक नियोजनामागील विचार!

लेखक राघव यांनी शनिवार, 23/09/2023 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही. --- आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही. एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे.

खचलेले शेजारी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 09/01/2023 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर घटनापीठाने काल परवा शिक्कामोर्तब केले असले तरी नोटबंदी किती परिणामकारक होती याचा एक स्पष्ट पुरावा पाकिस्तानच्या आख्ख्या अर्थव्यवस्थेने दिला होता. लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते.

असं का?

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 11/11/2022 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशात जो आकाश कंदील लागतो तो चीनमधून येतो. ते चीनमधे एवढा स्वस्तात बनवतात कि इथे भारतात बनवलेल्या आकाशकंदीलापेक्षाही स्वस्तात देऊ शकतात.आपण भारतात बनवलेला आकाश कंदील जीएसटी वगैरे सगळे टॅक्स भरून ३०० रुपयात जो आकाशकंदील बनवतो तोच आकाशकंदील चायनामधून इथपर्यंत ट्रांसपोर्टेशन करूनसुद्धा तीनशेला बाजारात आणू शकतात. भारतात मॅन्युफॅक्चरिंग करुन विकायला आपल्याला साडेचारशे पाचशे रुपयांशिवाय पर्याय नसतो. भारतात बनवलेली वस्तू भारतातच विकायला साडे चारशे पाचशे रुपये खर्च येतो.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-१० } चायना ऑन अलर्ट

लेखक मदनबाण यांनी रविवार, 24/07/2022 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही. तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.

इंधन - स्वस्त / महाग

लेखक टीपीके यांनी रविवार, 03/10/2021 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
तर ही गोष्ट त्या वेळची ज्या वेळी वेळी स्कूटर साठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं, गॅससाठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं फोन साठी पंधरा-वीस वर्षे थांबावं लागायचं, तरीपण आपण कसे महान याचा रशियन स्टाइल प्रपोगंडा चालायचा त्यावेळी वीज वाचवा पाणी वाचवा आणि इंधन वाचवा अशा आमच्यावर संस्कार केले जात होते.

Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

लेखक hrkorde यांनी रविवार, 19/09/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १.

नियोजन आर्थिक आपत्तीचे !

लेखक kvponkshe यांनी शनिवार, 28/08/2021 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
============================================================================================ ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते. ============================================================================================ असो ! आपण सगळेजण खूप कष्ट करून पैसे कमावतो. आपल्याला आनंद मिळावा म्हणून तो खर्चून विविध मार्गांद्वारे आपण आनंद मिळवतो.

म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - २)

लेखक अमर विश्वास यांनी शनिवार, 10/04/2021 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या भागात म्युच्युअल फंड चे विविध प्रकार पहाणार आहोत. उदाहरण म्हणून या लेखात काही स्कीम्स चा उल्लेख येईल. ह्या स्कीम्स माझ्या अनुभवरून मी वेळोवेळी गुंतवणुकीसाठी वापरल्या आहेत. तरीहि गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करावा आणि मगच निर्णय घ्यावा ____________________________________________________________________________________________________ सर्वप्रथम म्युच्युअल फंडाबद्दलच्या काही महत्वाच्या संज्ञा १. Entry & Exit load : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही शुल्क भरावे लागले तर त्याला entry load म्हणतात. बहुतेक सर्व स्कीम्स मध्ये entry load शून्य असते.

गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ?

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 08/04/2021 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
म्युच्युअल फंड्स च्या धाग्यावरील प्रतिसाद / चर्चा बघून मला हा धागा लिहावासा वाटला... यात मी माझे विचार मांडणार आहे. मी लिहीन तेच बरोबर अशी भूमिका कधीच नव्हती / नसेल त्यामुळे तुमचे विचार वाचायला जरूर आवडेल. तसेच काही लोकांना हा धागा बाळबोध (बेसिक) वाटण्याची शक्यता आहे ... त्याच्यासाठी गणेशा चा धागा आहेच __________________________________________________________________________________________________________________ गुंतवणूक का करावी ? भविष्यातल्या खर्चाची तरतूद म्हणून गुंतवणूक करावी. ऋण काढून सण करू नयेत असे म्हणतात आता भविष्यातले मध्ये कधीचे ? एक - पाच - दहा - पंधरा वर्षे ...