Skip to main content

अर्थकारण

एन्टरप्रेन्युअर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 31/07/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

लेखक विकास यांनी गुरुवार, 28/07/2016 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.

ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की

लेखक पुणे मुंग्रापं यांनी बुधवार, 11/05/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प. या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 09/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही.

"जेनेरिक" औषध एक कूट प्रश्न

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 17/04/2016 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
अधुनिक युगात अनेक बाबतीत संशोधन झाल्याने माणसाचे आयुष्य एका बाजूने सुखावह आणि तरीही त्याच बरोबर दीर्घकाळ टिकणार्‍या विकारांनी ग्रस्त झालेले दिसते. मधुमेह,रक्तदाब, संधिवात, थायऱोईडविकार ई नी मुळे आयुष्यभर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यासाठी जवळ जवळ एका व्यक्तीला दर महिन्यास १२०० ते २००० रूपये इतका खर्च येतो. इतका खर्च माणूस जेवणावरही करीत नाही.

मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 15/04/2016 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे. आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा

लेखक माहितगार यांनी सोमवार, 04/04/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
ऋण आणि व्याज यांच्या बाबतीत फसवणूकीचा इतिहास सोबतीने कुटूंब, समुह, देश यांच्यावर रास्त स्वरुपाचे नसलेल्या ऋण आणि व्याज या मुळे उध्वस्त होण्याची वेळ येणे खरेच खेद कारक असते. यामुळे कदाचित काही (कदाचित बहुतेक) धर्मसंस्था धर्मविचार ऋण आणि व्याज व्यवहाराचा निषेध करतात अर्थात अगदी टोकाची भूमिकाही इस्लाम सारख्या एखाद दुसर्‍या धर्मातून घेतली जाताना दिसते. ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे ह्या टोकाच्या नकारात्मक बाजू ह्या निषेधार्ह निश्चित आहेत.

शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 04/04/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी. 'राजलक्ष्मी आज भिशीला येणार नाही ती राजस्थानात कुठे तरी मुलाच्या शाळेत गेली आहे.’’ अरुणाने आल्या आल्या सांगून टाकले.