Skip to main content

अर्थकारण

भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 20/03/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
आलो रे धावून खास तुझ्यासाठी भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी करेल इच्छा पुरी चंद्रभागा काठी कर कटेवर ठेवुनी उभा हा जगजेठी ॥१॥ देईल सारे तुला जे सर्वांनाच हवे रोज रोज खाशील नवनविन मेवे सर्वांच्या आनंदाला उधाण यावे दही दुध तूप लोणी सर्वांनी खावे ॥ २॥ घेत असतो मी अधेमध्ये परीक्षा नापास झाल्यास देतो मोठी शिक्षा वेळ आली तर मागावी लागते भिक्षा अडल्याला करावी मदत ही खरी दीक्षा ॥ ३॥

फायदा घ्या बजेटचा

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 18/02/2014 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उध्वस्त इराक

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 12/02/2014 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली.

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

लेखक मोदक यांनी बुधवार, 22/01/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर: बेजान दारूवाला

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 06/01/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बेजान दारूवाला यांचे प्रेडीक्षण: १)नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर २)INR(रुपी) विल बी इन बिटवीन ५९ तो ५५ पर डॉलर मिपाकर ज्योतिषतज्ञ व FINANCIAL ANALYST हो, आपले काय मत आहे? कळावे, लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत