मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

उत्कल दिवस २०१२

अन्या दातार ·
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती.

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

चैतन्य गौरान्गप्रभु ·
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

सर्वांना होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.. :)

कॉमन मॅन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपा मालक-चालक-व्यवस्थापक आणि सर्व सन्माननीय मिपा सदस्यांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. :) धन्यवाद.. -- कॉमॅ.

मावळतीचा सूर्य

रेशा ·
लेखनविषय:
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

महाविजेता निवडा...

डॉ.श्रीराम दिवटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय मित्र-मैत्रिणींनो, व्यास क्रिएशन आयोजित ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत सर्वोत्तम अकरा निबंधामध्ये माझ्या निबंधाची निवड झाली असून त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे. लिंक ओपन करून त्यावर “like” करावे तसेच फेसबुक वरील आपल्या इतर मित्रमंडळींसाठी “share” करावे. http://www.facebook.com/photo.php?fbid=240088092745006&set=a.183154511771698.47993.134202923333524&type=1&theater मनापासून धन्यवाद! निबंध पुढे दिलेला आहे... व्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज... जुने ते सोने असे जरी म्हटले जात असले तरी नवे ते प्रत्येकाला हवेच असते हे विसरून कसे चालेल?

शि द फडणीस

चैतन्य गौरान्गप्रभु ·
लेखनविषय:
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.

गुलाब फक्त देणंच...

डॉ.श्रीराम दिवटे ·
जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा.

मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि नीलकांतचे आभार..!

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
सर्व मिपाकरांना मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या अमेकोत्तम शुभेच्छा..! आणि त्याचसोबत मी नीलकांताचे व प्रशांतचे देखील अनेक आभार मानतो की त्यांनी केवळ माझ्या आग्रहाखातर व माझ्या मनासारखे मुखपृष्ठ आज मिपावर चढवले.. :) सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे येथे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे..! :) सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा... तात्या.

पद्मभूषण प्राण सिकंद यांचा आज 92वा वाढदिवस... ...

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्र हो हिन्दी सिनेजगतातील खलनायक पद्मभूषण प्राण सिकंद यांचा आज 92वा वाढदिवस... ...
...त्यांच्या आयुर-आरोग्याचे शुभ चिंतन!...

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

यकु ·
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.