फ़ॉर हिअर ऑर टू गो!!
जनरली कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये ,खास करून अमेरिकेतल्या बर्गर किंग, वेंडीज, फ़्रेंडलिज अशा उपहार गृहातून हा प्रश्न विचारला जातो. अर्थ साधाच, "इथेच खाणार की घेऊन जाणार?" पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?"
मिलिंद प्रधान यांनी हे पुस्तक मला पाठवून दिलं आणि झपाटल्यासारखं मी ते वाचून काढलं. लेखिका अपर्णा वेलणकर. बृहन्महाराष्ट्र मंडळानं या पुस्तकाचा प्रकल्प आयोजित केला. काय कारण असावं?