फक्त तुझ्यातच
फक्त तुझ्यातच
विश्व सारे शान्त आहे
फक्त तुझीच भ्रान्त आहे
प्रतिभा आत्मविश्वासाने भरलेले
तारुण्य फक्त तुझ्यातच
जीवन किल्मिशात गु॑तलेले
माझे तुझ्यात गु॑फलेले
प्रत्यय, अनुभवा॑नी नटलेले
कारुण्य फक्त तुझ्यातच
नयनास्त्रा॑च्या वेधातुन
फुललेल्या अबोल भेटीतुन
अगम्यात ब्रम्ह शोधण्याचे
सामर्थ्य फक्त तुझ्यातच
Taxonomy upgrade extras
मिसळपाव