Skip to main content

प्रतिभा

पहाट

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 27/10/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
दीप निवले रात्रीचे पहाटही अशी फुले केसातील मोगरयाचा गंध अजून, अजून खुले शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले पहाटेला भेटण्यास रात्र परत आली उगवली पुन्हा फिरूनी क्षितीजावर चांदणी
Taxonomy upgrade extras

विषकन्या (पूर्ण)

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 25/10/2008 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागील वेळी पूर्ण न लिहीता, ईस्नीपचा ऑडियो टाकला होता. त्यामुळे काहींची गैरसोय झाली होती.
Taxonomy upgrade extras

उत्सव - वाटेवरील रंग

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 22/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो. वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली.

(कुंतलांचा पसारा)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - मिपाची कवयित्री प्राजू हिची 'आठवांचा पसारा' ही सुंदर कविता! 'चतुरंगप्रयातात' हे विडंबन करण्याचा प्रयास केलेला आहे.. उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा सुगंधीच मेंदी असावी उशाशी उडू लागला रंग हा आज सारा कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा उडाली पहा रातची झोप माझी कुणा वैद्यकाचा मिळे ना सहारा जरी टाळतो मी तुझ्या आलयांना तुला नापिता पाहु येतो शहारा चला संपला भार या डोसक्याचा मिळाला वयाने मला हा इशारा चतुरंग

(मदार)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 20/10/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि.... नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे... आता विडंबने ही, माझी मदार आहे... आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची; निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे... मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... का भाव मोल केला, ही शायरी अशी का? मारुन सर्व बाता, होतो फरार आहे! 'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!' हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे? गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; 'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आ

व्यथा

लेखक सुरताल यांनी रविवार, 19/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
सारे ओळखीचे डोळे पुसून गेले! होते अनोळखी ते गाली हसुन गेले! ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की, माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले! माझ्या पराभवाची चर्चा कुठे न झाली घायाळ काळजाला विंचू डसून गेले! डोळ्यात चाहत्यांच्या मी बांधल्या हवेल्या कळले मला न केंव्हा घरटे बसुन गेले! जे काल जाहले ते मी आठवू कशाला? डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले! सुरताल
Taxonomy upgrade extras

भाव (रणजित देसाई यांच्या 'आलेख' या ग्रामीण कथा संग्रहातील कथा)

लेखक mina यांनी शुक्रवार, 17/10/2008 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
येथील लेखन काढून टाकलेले आहे. कृपया हे वाचा व यापुढे सहकार्य करा अशी कळकळीची विनंती... --आणिबाणीचा शासनकर्ता.

खिडकी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 17/10/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्ही काही काळजी करू नका. दिवसाचा तर प्रवास आहे. पोहोचल्यावर लगेच फ़ोन करतेच मी तुम्हाला." गाडी सुटता सुटता अनुराधाने पुन्हा एकदा सुभाषला सांगीतले. वेग घेणाऱ्या गाडीबरोबर धावणारा सुभाष तिला आणि सोनुला हात हलवून निरोप घेता घेता दिसेनासा झाला. त्याबरोबर आणखी वेळ न दवडता शेजारी बसलेल्या बाईने लगेच सोनुकडून आपली खिडकीची जागा मागून घेतली. मस्तपैकी मांडी घालून कोपऱ्याला रेलून तिने मासीकात डोके खुपसले. सोनुने नाराज होऊन आईच्या बाजुची आपल्या जागेवर टेकल्यासारखे केले. त्या लठ्ठ खवीस बाई शेजारी बसण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. जरी खिडकीच्या बाहेरचे तिथून चांगले दिसले असते तरी!

त्रिवेणींची वेणी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 16/10/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणी हा एक अनोखा काव्यप्रकार. चारोळ्या चार ओळींच्या तसे त्रिवेणी, हायकू तीन ओळींचे. त्यातही हायकूतल्या प्रत्येक ओळीतल्या अक्षरांच्या संख्येवर बंधन. कवीश्रेष्ठ गुलजारांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद आंतरजालावर वाचनात आला. 'साखळी हायकू' या आंतरजालीय खेळात सहभागी झालो होतो, तेव्हा त्रिवेणी जवळून पहायला व हाताळायला मिळाल्या.

(भलताच जाच!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 15/10/2008 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जुका यांची 'बिघडलीये काच' बघून अचानक आम्हाला कवितेच्या दोन-दोन प्रतिमा दिसायला लागल्या आणि मग दुसरी प्रतिमा टंकण्याखेरीज प्रत्यवाय उरला नाही!