Skip to main content

प्रतिभा

(काही कविता)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 26/11/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल रामदासांच्या 'काही कविता' वाचल्यापासून अस्वस्थ होतो, दोन समजल्या नाहीत म्हणून आणि दोन समजल्या म्हणूनही! आज त्यांच्या कवितेवरची त्यांची स्वतःची टिप्पणी आणि मुक्तरावांचे विवेचन बघून कविता समजल्याचा हर्ष झाला.

निरभ्र

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 25/11/2008 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
झाकोळल्या सावल्यांनी हुंकार असा का द्यावा डोळ्यांतला तुझा तो मज मारवा स्मरावा
कागदावर झरझर अक्षरं उमटत जातात... दिवसही एखादा असा येतो की आठवणी दाटून येतातच. सकाळच्या वेळी तर हमखास. दाटून येतात त्याही संध्याकाळच्याच आठवणी... 'काय करते आहेस?' आधी 'तू नभातले तारे...'ची गुंजारव. त्याच्या कॉलसाठी आपण लावून ठेवलेली. आणि त्यापाठोपाठ त्याचा प्रश्न. नेहमीचाच. वेळही नेहमीचीच. पश्चिमेला गुलाबी छटा येतात तीच. एक छोटासा संवाद आणि नदीकाठी पुलावरची भेट. नदीही साथ देणारीच. पूर्व-पश्चिम. त्यामुळे पुलाचे दोन्ही कठडे त्या दिशांना. आपण बसायचो तो पश्चिमेचाच.

""कालचक्र""

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 22/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य एक संध्या कोमल गंधार, कुसुंबी किनार क्षितिजाला... तेजस्वी रवीची किरणे सोनेरी, लाली गालावरी संध्येच्या का !?! मुग्ध प्रियतमा संध्या ती आरक्त, का 'रवी' आसक्त 'निशे'वरी ! दुखावली 'संध्या' हळवा गंधार, का क्षितिजापार गेला सखा..... हवेत गारवा नभी चंद्र तारे, मादक इशारे निशेचेही... आसुसला 'रवी' निशेच्या छायेला, कौमुदी कायेला चंद्र साक्ष... मिठीत 'रवी'च्या 'निशा'ही उन्मुक्त, प्रकाश अव्यक्त अंधारला... मेघाचा मल्हार, कित्येक प्रहर, प्रणय कहर, आसमंत..... पहाट भैरवी तिमिर छेदून, गगन भेदून, झंकारली.

अकल्पित..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 21/11/2008 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
"सुमना, निघतो गं." रावसाहेबांनी सुमनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला हाक मारून सांगितलं. "हो बाबा या. आणि हो, संध्याकाळी दाजी काका येणार आहेत तेव्हा ओफिसधून लवकर या. मी, सुशांतलाही सांगितलं आहे. तो ही संध्याकाळची त्याची डिप्लॉयमेंट उद्या करतो आहे. मी ही आज स्टुडीओतून लवकरच येणार आहे." सुमनाने, स्वतः चा डबा बॅगमध्ये ठेवत ठेवत सांगितलं. "पण आज तू उशिरा निघाली आहेस का? कारण ८.३० वाजले गं" .. रावसाहेबानी विचारलं. " हो.. आज ९.३० वाजता जाणार आहे मी. आज डेमो आहे क्लायंटला माझ्या डिझाईनचा. त्यामुळे डायरेक्ट तिकडेच जाईन. बर, तुम्ही निघा.. मी ही आता अंघोळ वगैरे आटोपून घेते." असे म्हणत सुमना आत वळली.

खेळ दोन ओळींचा - २

लेखक राघव यांनी मंगळवार, 18/11/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! मागल्यावेळी तर भन्नाट डोकी चाललेली.. यावेळी बघुयात कसे काय जमते ते! मुमुक्षु :)

काम

लेखक निमीत्त मात्र यांनी शनिवार, 15/11/2008 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही. काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे....

नंदावैनी...!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/11/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!" "राहूल, का उठलास जेवता जेवता? एवढाच भात उरला आहे तो संपवून टाक पाहू पटकन.." "अरे वा! आमची अस्मिताताई आली का शाळेतून! आज काय बुवा मज्जा आहे एका मुलीची. आज वाढदिवस म्हणून नवा ड्रेस घालून शाळेत गेली होती वाटतं माझी राणी! चल, हातपाय धुवा बेटा लौकर. गरमगरम वरणभात खायचाय ना?" "अरे देवा, थांब मी आल्ये..! काय खाल्लस काय रात्री? अरे थांब थांब, उभा रहा तिथेच. नाहीतर ते बरबटलेले कुले घेऊन हिंडशील गावभर.." असं म्हणून पदरबिदर खोचून नंदावैनी त्या कुणा लहानग्याला उचलून घाईघाईत संडासात घेऊन जाते! :) "प्रसाद, तू का घेतलास त्याचा चेंडू?

प्रभात राग रंगती...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या पहाटे 'ललत' षड्ज मध्यमी मूर्च्छना चालली 'भटियारा'ची प्रभातरंगी अर्चना डमडम डमरूची आली 'भैरवा'ची स्वारी तीव्र मध्यम वाढवी 'रामकली'ची खुमारी कारुण्यमय 'तोडी'ची 'आसावरी'शी संगती 'अहिरभैरवा' संगे प्रभात राग रंगती..! -- तात्या अभ्यंकर.
Taxonomy upgrade extras

घागबुवा

लेखक व्यंकु यांनी मंगळवार, 11/11/2008 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उत्सवाचे दिवस चालू आहेत कोकणात या उत्सवाला खूप महत्व त्यानिमीत्त मनात आलेला एक विषय. दत्तदासबुवा घाग हे एक अलौकिक, प्रतिभावंत, जाणकार व्यक्तीमत्व, आहे. ते मुळचे नृसिंहवाडीचे. आज बुवांची पासष्टी उलटली तरी बुवा तितक्याच उत्साहाने किर्तनाला उभे राहतात. पण हल्ली बुवांनी किर्तने कमी केली. मी अलीकडच्याच काळात त्यांच किर्तन पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या ओळखितील जाणकारांच्या मते बुवांचा आवाज पुर्वीच्या तुलनेत 30% पण राहीला नाही पण तो आवाजही आज अत्युच्च आनंद देउन जातो. पण आता वयोपरत्वे बुवांना तब्येतही साथ देत नाही. तेव्हा बुवांना तब्येतीची साथ आणि किर्तनाचा उत्साह लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८ - अभिप्राय

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/11/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा काव्यकट्ट्याच्या नोव्हेंबर २००८ च्या काव्यस्पर्धेतील रचनांवर अभिप्राय येथे द्यावेत. अन्य कोणतेही लेखन येथे करू नये. धोंडोपंत
Taxonomy upgrade extras