मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८
लोकहो,
मिपावरील आमच्या छंदशास्त्रीय लेखनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मिपावरील काव्यप्रेमींना धन्यवाद. भारावून टाकणारा हा प्रतिसाद आहे.
असा प्रतिसाद कोणत्याही मराठी संकेतस्थळावर आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. मिपाला उथळ वगैरे म्हणणार्यांनी हे सदर पहावे.
या प्रतिसादावरून एक गोष्ट सिद्ध झाली की अनेक जण उत्कृष्ट काव्यलेखनाची क्षमता बाळगून आहेत. फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि वाव मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने "मिसळपाव काव्यकट्टा" आजपासून सुरू होत आहे.
मिसळपाव काव्यकट्टा हे मिसळपाववरील कवींसाठी काव्यसंमेलन आहे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव