Skip to main content

प्रतिभा

भुलण्याचे वय तुझे... सावर सावर

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 04/11/2008 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आज अशी एक घटना घडली की हातून एक ’उपदेशात्मक’ कविता लिहून झाली. ही कविता आमच्या अत्यंत आवडत्या छंदात ८/६/८/६ मध्ये लिहिलेली आहे. या छंदाची लय आम्हाला फार फार आवडते. पहा तुम्हाला आवडते का? (लयीत वाचणे सुलभ जाऊन काव्याचा चांगला आस्वाद घेता यावा, म्हणून जिथे पॉझ घ्यायचा तिथे स्वल्पविराम दिला आहे.
Taxonomy upgrade extras

(तसा कुठे मी....)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 03/11/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
गझलेच्या विशेषांकातली अनंत ढवळे ह्यांची 'तसा कुठे मी..' ही गजल वाचली आणि माझे जिवापाड चालवूनही फसलेले अनेक प्रयत्न डोळ्यांसमोर येऊन गेले!

धुकं.. फोटोज!

लेखक राघव यांनी रविवार, 02/11/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
केरळच्या छोटेखानी ट्रीपवर गेलेलो असताना केरळ बॉर्डर वर नाक्यावर एक-दीड तास थांबवे लागले होते.

पतंग

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 02/11/2008 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
लाल निळा शेपूटवाला पतंग उडवू चला चला
खाऊचे पैसे देऊन रीळ आणले वाण्याकडून केला मांजा काचा कुटून हात काचले घोटून घोटून
...........
दादाने मग ताव कापला कमच्या बांधुन पतंग केला झिरमिळी शेपट्या बांधल्या मैदानावर जाउ चला
लाल निळा शेपूटवाला पतंग उडवू चला चला ...........
ताणुन दोरी उंच फ़ेकला सरसर भरभर हवेत चढला गिरक्या घेता नाच नाचला पक्षासंगे मजेत फ़िरला
.............
आणा खाली ढील सोडुनी घ्या बाजुला हिसका देऊनी चढवा दुसऱ्या मांजाखालुनी वळसे घाला गोल फ़िरवु
Taxonomy upgrade extras

संयमी जगज्जेता!!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 31/10/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं. आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती.

पालखी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 30/10/2008 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८ 'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी? आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 29/10/2008 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या!

रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 29/10/2008 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे. सध्या ठाणे येथे न्यु गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे.

अवघा रंग एक झाला....

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 28/10/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील उभा-आडव्या-सरळ-तिरप्या अश्या कुठल्याही अक्षरात बसत नाही असे नम्रपणे नोंदवू इच्छितो..! :) 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..' रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..! रघुनंदन पणशीकर.. 'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द!

बापू सोनावणे..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/10/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे!