मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्नोत्तरे

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

स्वीट टॉकर ·
आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे. विचारलंत ना? घ्या आता!

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

निनाद ·
लेखनविषय:
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा. मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अ‍ॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी - https://www.arduino.cc/ https://en.wikipedia.org/wiki/Arduino http://playground.arduino.cc/Projects/Ideas या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!

मला पडलेला प्रश्न ०२

महेश शिपेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शहर कोणतेही असो १) कोणताही सामाजिक उपक्रम हा त्या भागातील मंडळे सादर करतात २) कोणतेही जन आंदोलन करताना तिथली जनता करते खरेच जर हे सामाजिक कार्य असेल तर दरवेळी सरकारला किंवा सरकारी अधिकारी अथवा जन प्रतिनिधीना जबाबदार न धरता जनतेलाच का वेठिस धरले जाते उदाहरणार्थ :- १) रस्ता रोको, चक्का जाम, सार्वजनिक वाहतूकिच्या साधनांची मोडतोड २) (आधी ठराविक ) आता सगळ्याच सण उत्सव, यात्रा, जत्रा यावेळी लावले जाणारे कर्णकर्कश्य त्रासदायक साउंड सीस्टिम टिप:- नागरिकांना याचा खरेच त्रास होतो तर ते आपल्या मुलांचे या बद्दल प्रबोधन का नाही करत कारण ते उपक्रम राबवणारे तसेच दगडफेक तोडफोडीत डांबले जाणारे कार्यक

मला पडलेला प्रश्न

महेश शिपेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रोजच्या जीवनात मला पडणारे प्रश्न शहर कोणतेही असो निवडणुका आल्यावर प्रत्येक रस्त्याच्या सुरूवातीला व शेवटी सदरचा रस्ता कोणत्या आमदार / खासदार वा नगरसेवकाच्या कुठल्या निधीतून झाला किती खर्च झाला ठेकेदार कोण होते असे भपकेदार पोस्टर / बँनर झळकत असतात पण जेव्हा त्याच रस्त्यावर खड्ड्याचां भुलभुल्लैया होतो नागरिकांच्या मनक्यांचा शाँक अबझाँरव्हर होतो वाहनांचा खुळखुळा आणि शरीराचा भुगा होतो तेव्हा हे आमदार खासदार ठेकेदार इतकेच काय त्या रस्त्याच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी/अधिकारी व ठेकेदाराचे पेमेंट करणारे आँडिटरची नावे कधीच कुणालाच कळत नाहीत टिप:- नागरिक ही ती शोधत नाहीत असं का??

या पुस्तकांची माहिती मिळेल का ?

nishapari ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण ८ - ९ वर्षांपूर्वी , ही पुस्तकं माझ्या वाचनात आली होती . खूप आवडलीही होती . पण पुस्तकाचं किंवा लेखकाचं नाव लक्षात ठेवावं म्हणजे त्या लेखकाची बाकीची पुस्तकंही वाचता येतील किंवा तेच पुस्तक नंतर कधीतरी वाचता येईल एवढी अक्कल त्या वयात नव्हती . आता मी त्या पुस्तकांचं साधारण कथानक सांगते . मिपावरच्या वाचनप्रेमींपैकी कोणी वाचली असतील तर कृपया पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव सांगा . मी फार आभारी राहीन . १ - हि एक पेंग्विन्स च्या आयुष्यावर आधारित कादंबरी होती . म्हणजे माणसांच्या दृष्टिकोनातून पेंग्विन्सची माहिती नाही ; तर यातली प्रमुख पात्रंच पेंग्विन होते .

दहावी पास मुलांसाठी वाचनीय पुस्तके

अत्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या ओळखीच्या एका मुलाला नुकतेच दहावीमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. त्याला बक्षीस म्हणून पुस्तक द्यायचा विचार करत आहे. कृपया १. करीयर मार्गदर्शन २. प्रेरणादायी (चरित्र वगैरे) या विषयांवरील वाचनीय पुस्तके (शक्यतो मराठी) सुचवा. धन्यवाद.

(छटाक) नंतर

नाखु ·
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

वेताळकथा: तर त्यांचे नाते काय असावे?

पाषाणभेद ·
मिसळपाव.कॉम वरील वाचकाने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीसारखाच नविन काय वाचायला आले आहे ते पाहण्यासाठी तो पुन्हा ऑनलाईन आला. ते पाहून वेताळ त्याला म्हटला, "हे वाचका, असाही तू वेळ घालवण्यासाठी येथे आला आहेस. या जगात मानवप्राणी अगदी वेगळा आहे. थोडा विचित्र आहे असे म्हटले तरी चालेल. तर मग मी अशाच प्रकारातील एक सत्यकहाणी सांगतो ती तू ऐक म्हणजे तुझा वेळ मजेत जाईल." असे म्हणून वेताळ सत्यकहाणी सांगू लागला----- पाषाणभेदने क्लायंटला आपले बोलणे पटवून दिले. क्लायंटसमोरील काम संपल्यानंतर आपल्या कामाच्या धोपटीत आपली नेहमीची कागदपत्रे ठेवली अन ती आपल्या खांद्यावर अडकवली.

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

जय जय रघुवीर समर्थ ! प्रस्तावना : ( माघकृष्ण नवमी , गुरुवार मार्च ३, २०१६) सर्व साधकांना दासनवमीनिमित्त सादर प्रणाम!

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

नीलमोहर ·
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...