Skip to main content

प्रश्नोत्तरे

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

आकाशवाणी वरील जुने कार्यक्रम कुठून/कसे मिळवायचे?

लेखक अत्रे यांनी गुरुवार, 15/06/2017 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
युट्युब वर "old radio" असे शोधल्यास बरेच इंग्रजी कार्यक्रम सापडतात (जसे की वेगवेगळ्या पुस्तकांची वाचने, नाटक , मुलाखती वगैरे) . बीबीसी तर आपले जुने कार्यक्रम ऑडिबल वर "ऑडिओ बुक" म्हणून विकताना दिसते. आपल्या भारतीय आकाशवाणीवरही असे बरेच कार्यक्रम स्वातंत्र्य मिळाल्यापासून (किंवा त्या आधीही) होत आहेत. पण ते कधी पब्लिक डोमेन मध्ये सगळ्यांसाठी खुले असताना दिसत नाहीत. म्हणजे - भारताला स्वातंत्र्य मिळत असताना रेडिओवर काय बातम्या देत होते किंवा ३० वर्षांपूर्वी रेडिओवर कोणत्या पुस्तकाचे झालेले वाचन किंवा पु ल देशपांडेंचा रेडिओवर एखाद्या कार्यक्रमात असलेला सहभाग..

देशाचा अपमान

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 05/01/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती. "इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक. . . "बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले. "तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?) "असंच, मला माहिती आहे." थोरली पाती. "अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?" "गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो." . . वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

लेखक डिस्कोपोन्या यांनी बुधवार, 14/12/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

जीवन -एक रडगाणे

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 09/12/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर गेल्या काही दिवसात आलेले धागे बघता,'जीवन -एक रडगाणे' नामक नवीन दालन सुरु करावे अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो. ह्या दालनात दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांमुळे येणारे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होईल (मग मिपावर आपण वेगळे काय करतो असा प्रश्न काही दुत्त दुत्त मिपाकरांना पडेलच! त्यांना फाट्यावरून इग्नोर मारावे !). दैनंदिन समस्यांमुळे माणसाच्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि त्यांची त्याने शोधलेली उत्तरं ह्यावरही उहापोह होईल. सोबतीला मिपातज्ञ आहेतच. तर दालनाच्या बोहनीसाठी आमच्याकडून काही चिल्लर. प्रश्न १.

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 24/11/2016 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.

खुलता खुळी खुलेना...

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/09/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

मोहिम-ए-संपादक

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 22/09/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला झेपेनासे झाले. अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.