लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता
प्रियदर्शनचे दिग्दर्शन असलेल्या अनेक चित्रपटांतील कथा हि एखाद्या शांत , निवांत , निसर्ग रमणीय गावामधे घडते . उदाहरणार्थ हिंदीतील मुस्कुराहट , खट्टा मिठा .
लिसा लिसा या २००३ मधे प्रदर्शीत झालेल्या तामीळ चित्रपटामधीलही वातावरण असेच रम्य , शहरी धकाधकीपासुन दुर आहे . कथा नायक राकेश ( शाम ) हा तरुण येथे आपले वाडवडीलोपार्जीत घर , शेती एकट्याने सांभाळतो आहे . पुढे मागे पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालु आहेत .
चंद्रु हा त्याचा मित्र ( विवेक ) अनेक उद्योगांत आपले पैसे गमावुन बसला आहे .