Skip to main content

प्रकटन

कंटाळा

लेखक पाटिल यांनी रविवार, 17/10/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.

अवघाचि संसार- जांभुळपाडा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 16/10/2021 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ हरभटांनी अलिबागला जायला बोट पकडली. इतक्या दिवसांनी मुलाला भेटायला जाणार म्हणून भागीरथीबाईंनी त्यांच्या सामानात काय काय जिन्नस भरून दिले होते. खरेतर हरभटांच्या कपड्याची एकच पडशी होती आणि बाकीचे सामान सगळे रामसाठी दिलेल्या वस्तूंनीच भरून गेले होते. खरेतर भागीरथीबाईंना स्वतः च रामला भेटायची फार इच्छा होती, पण घराच्या सगळ्या रागाड्यातून त्यांचा पाय कुठे निघायला ?

अवघाचि संसार- हिंदळे-२

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 13/10/2021 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
यथावकाश सरस्वतीचे बाळंतपण होऊन तिला एक गोड मुलगा झाला आणि कावेरीचेही सणवार आटोपून ती हरकूळला परतली. सड्यावरच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने थोडके पैसे मिळाले त्यामुळे सर्व यथासांग पार पडले. बघता बघता वर्ष संपत आले. यावर्षी पीकपाणी ठीकठाक झाले होते.वरुण राजाने कृपा केली होती त्यामुळे सगळीकडे अगदी आबादी आबाद नव्हे पण समाधानकारक परिस्थिती होती. हरभटांची शेती गावातल्याच कुळांना खण्डाने कसायला दिली होती .त्याचे ४-५ पोती भात दसऱ्याला घरपोच आले असल्याने वर्षभराची बेगमी झाली होती. कोकणी माणसाला असे लागतेच काय? दोन वेळच्या जेवणात भात ,कधीतरी भाकरी.

कारपोरेटातली विंग्रजी

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 12/10/2021 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी मूलतः गाढव आहे, चुकुन मनुष्य योनीत आलो असे वाटते. गाढवपणा फक्त रक्तात नाही तर मांसल पेशींच्या रंध्रारंध्रापर्यंत पोहचलेला आहे. असे हे गाढव आयटीत चिकटले म्हणून त्याचा तेनालीराम होत नाही. माझ्या सोबतीची मंडळी सुद्धा गाढव असावीत असा माझा समज होता. आम्हा गाढवांमधे एक सुंदर, हुषार मुलगी होती. बऱ्याच मंडळींना त्या कारणाने आमचा हेवा वाटायचा. आम्ही लिनक्सवर काम करीत होतो. ती डिस्ट्रो, रेडहॅट, डेबियन अशा माझ्यासारख्या गाढवांना न समजनाऱ्या भाषेत बोलत होती. मला ती मुलगी जादुगार वाटत होती. काहीतरी टाईप करायची दोन सेकंदात सार गायब, परत काहीतरी टाईप करायची तर धडधड सारी अक्षरे वर जात होती.

अवघाचि संसार-हिंदळे

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 11/10/2021 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
अहो ऐकलंत का? नुकतीच घरच्या देवाची पूजाअर्चा करून , ग्राम दैवत असलेल्या कालभैरवाच्या देवळात जाण्यासाठी तयार होत असलेल्या हरभटांना पत्नी भागीरथी बाइंची हाक कानी आली.नुकते कुठे झुंजू मुंजु झाले होते. सगळीकडे शांतता होती. नाही म्हणायला गोठयातल्या गायींच्या गळ्यातील बारीक घुंगरांचा, विहिरीवरील पाणी शेंदायचा, कोंबडा आरवल्याचा, रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या बैल गाडीच्या चाकांचा ,असे काही परिचित आवाज येत होते. पण हिंदळ्यासारख्या गावंढ्या गावात असून असून वर्दळ ती कितीशी असणार? कोकणातल्या कोणत्याही गावासारखे एक साधे सुधे गाव. समुद्र किनारा थोडका लांबच , त्या पेक्षा खाडी जवळ.

मंत्रपुष्पांजली

लेखक Trump यांनी शनिवार, 09/10/2021 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रपुष्पांजली जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत. कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच. मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे. ----- माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA मधुरम : गैया संस्कृत https://www.youtu

नर-नारी तत्व, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर

लेखक सतीश रावले यांनी मंगळवार, 05/10/2021 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
nar-naari नर-नारी, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर ........................................................... सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना ह्या दोन वीशयान्बाबतची लोलूपता हा नारी तत्वाचा गाभा असतो. ‘स्व-अस्तीत्व’ व ‘समाज-ओळख’ ह्या वीशयान्बाबतची लोलूपता हा नर तत्वाचा गाभा असतो.

बखरीतून निसटलेलं पान..

लेखक पाटिल यांनी रविवार, 03/10/2021 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..

अलक (अति लघु कथा)

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 01/10/2021 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
अलक 1 त्यांच्या शाळेची ट्रिप कोकणात समुद्र किनारी जाऊन आली होती. सगळ्या जणी एकदम खुश होत्या. समुद्र कसा वाटला त्याच वर्णन त्या बाईंना सांगत होत्या. समुद्रावरून वाहणारा तो खारटसर वारा, त्याचा चिकट असा स्पर्श, पायाखालची मऊ मऊ वाळू, पावलांना हळुवारपणे पाण्याने भिजवणार्या लाटा सगळं मोहवून टाकणारं होतं. अगदी पाण्याला हात लावून, त्याची चव घेऊन त्यांनी समुद्र अनुभवला. एकामागून एक येणाऱ्या लाटा संपतच नव्हत्या. नुसतीच पावलं भिजली होती, अजून थोडी पुढे जायची इच्छा होती पण मॅडम ची परवानगी नव्हती. त्या सगळ्या जणी उत्साहाने समुद्राचं वर्णन करत होत्या.

अभियांत्रिकीचे दिवस-७

लेखक पाटिल यांनी शनिवार, 25/09/2021 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
होस्टेलमध्ये स्वत:ची रूम सोडून इतर कुणाच्याही रूममध्ये ढुंगण वर करून लोळत पडण्याची परंपरा आणि शिवाय धाडकन दार उघडून कुठंही कधीही घुसण्यात काही गैर आहे, असं कुणाच्या डोक्यातही येणं अशक्य असल्यामुळे तिथं प्रायव्हसीचं साधं सुख मिळण्याचा काहीच विषय नसायचा. म्हणजे समजा असाच कधीतरी मी माझ्याच रूममध्ये प्रवेश केला असता नेहमीचीच रिकामटेकडी जनता तिथं असभ्य असामाजिक वगैरे अवस्थेत अस्ताव्यस्त पसरून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहून लाळ गाळते आहे, हे एक दृश्य तसं नेहमीचंच. कारण स्क्रीनवर चालू असलेल्या रोमॅंटिक सीनमध्ये समजा विदेशी हिरो-हिरोईन मुक्त प्रेमाचा वगैरे आविष्कार सादर करत आहेत. एवढ्यात "ह्यात काय मजा