थोडे असे, थोडे तसे
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला.
एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार."
खरोखरच चांगला विचार.
तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला,
एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.
मिसळपाव
आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.