उचललेस तू मीठ मुठभर

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

विकांत - मालवण (तारकर्ली).....

लेखनविषय:
मिपाकरहो, येणा-या विकांतासाठी हापिसच्या गँग सोबत मालवण (तारकर्ली) येथे जाण्याचे प्रयोजन केले आहे. फिरस्त्यांना मालवण (तारकर्ली) बाबतचे (मार्ग, रहण्याची व जेवणाची सोय, कुठे-कुठे आणी कोणते ठिकाणी भेट दिली पाहिजे इत्यादि... )आपले अनूभव, सुचना, शिफारस "शेअर" करण्याची नम्र विनंती..... कळावे, लोभ असावा नाम्या झंगाट

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

... देवाचं घर !

माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

व्यर्थ न हो त्यांचे बलिदान....

लेखनविषय:
उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो. उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल.

[अनुभव] बॅन्कांचा हलकटपणा

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्याकडे Standard Chartered बॅंकेचे क्रेडीट कार्ड आहे. नुकताच मला बॅंकेकडून फोन आला. पलीकडे फोनवरुन बोलणारा सेल्समन, त्याची सगळी कौशल्ये पणाला लावून मला म्हणाला की माझे आतापर्यंतचे रेकॉर्ड बघुन बॅन्केने माझे कार्ड upgrade करायचे ठरवले आहे. त्या कार्डाच्या सुविधा मला एक वर्ष फुकट वापरता येतील. त्याअगोदर माझे सध्याचे कार्ड एक महिन्या नंतर रद्द होईल, इत्यादि. मी टेलिफोनवर खपविण्यात येणा-या कोणत्याही योजनेस कधिही भुलत नाही. वरील संभाषणात मी त्या सेल्समनला एक प्रश्न परत परत विचारला - या नव्या कार्डाची वार्षिक फी एका वर्षानंतर मला किती द्यावी लागेल.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.
Subscribe to मत