[अनुभव] बॅन्कांचा हलकटपणा
माझ्याकडे Standard Chartered बॅंकेचे क्रेडीट कार्ड आहे. नुकताच मला बॅंकेकडून फोन आला. पलीकडे फोनवरुन बोलणारा सेल्समन, त्याची सगळी कौशल्ये पणाला लावून मला म्हणाला की माझे आतापर्यंतचे रेकॉर्ड बघुन बॅन्केने माझे कार्ड upgrade करायचे ठरवले आहे. त्या कार्डाच्या सुविधा मला एक वर्ष फुकट वापरता येतील. त्याअगोदर माझे सध्याचे कार्ड एक महिन्या नंतर रद्द होईल, इत्यादि.
मी टेलिफोनवर खपविण्यात येणा-या कोणत्याही योजनेस कधिही भुलत नाही. वरील संभाषणात मी त्या सेल्समनला एक प्रश्न परत परत विचारला - या नव्या कार्डाची वार्षिक फी एका वर्षानंतर मला किती द्यावी लागेल. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे त्याने शिताफीने टाळले तेव्हा मी त्याला कडक शब्दात मला त्याच्या योजनेत रस नसल्याचे सांगितले आणी फोन बंद करायला सांगितले. त्याने माझे चालू कार्ड बंद होणार असल्याची मला परत परत धमकी दिली पण माझ्याकडे दूसरे कार्ड असल्याने मी त्याला बधलो नाही.
यातून काही मुद्दे उपस्थित होतात -
० बॅंन्क परस्पर कार्ड upgrade करु शकते का?
० तसेच जुने कार्ड परस्पर रद्द करू शकते का?
रिझर्व बॅन्केने वसुली एजटांचा छळवाद थांबवण्यासाठी काही पावले नुकतीच उचलली. पण क्रेडीट कार्डच्या योजना आणि त्याविषयीच्या तक्रारी निवारण करण्यासाठी ट्राय सारखी एखादी नियामक संस्था आहे का?
याच अनुषंगाने मला दूसरे एक निरीक्षण इथे नोंदवायचे आहे. बर्याच बॅन्कानी आता कोअर बॅन्कींग स्वीकारले आहे. कोअर बॅंकींग मुळे जुने खाते क्रमांक न वापरता नवे १२ आकडी खाते क्रमांक वापरायचा आग्रह बॅंका धरतात. आता जे लोक ECS वापरतात त्यांच्यावर बॅन्केने नवे खाते क्रमांक संबंधिताना कळविण्याची जबाबदारी टाकली आहे. मला हे खटकते कारण कोअर बॅंकीग हे बॅन्केने स्वीकारलेले तंत्रज्ञान आहे आणि त्याचे implementation ग्राहक निरपेक्ष आणि पारदर्शक व्हायला हवे. साठी-सत्तरी गाठलेल्या लोकांना नवा खाते क्रमांक बदलायला लावण्यासाठी धावाधाव करायला लावून बॅंकाना काय मिळते हे कळायला मार्ग नाही. एखादी नवी प्रणाली वापरात आणताना ज्येष्ठ नागरीकांचा विचार प्राधान्याने व्हायला हवा पण आपण भारतीय लोक हे कधी शिकणार देव जाणे...
वाचने
3327
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
तुमचं
साठी-सत्तर
In reply to साठी-सत्तर by JAGOMOHANPYARE
डीएनएस
In reply to डीएनएस by प्रकाश घाटपांडे
तुमाला
In reply to डीएनएस by प्रकाश घाटपांडे
तुमाला
तुम्ही
In reply to तुम्ही by देवदत्त
महत्त्वाच
थोडे विषयांतर
मला असाच