मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

भोपाळ

विकास ·
लेखनप्रकार
* भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले.

ट्रॉय

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
ट्रॉय खरतर एक शोकांतीका म्हणावी का शौर्य कथा असा प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे. हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय अनुभवांपैकी एक असा अनुभव. हा चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक न राहता ह्या कथेतील एक पात्र बनुन जातो.

हे घ्या थोडं मीठ... चोळा तुमच्या जखमांवर !

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुमच्यापैकी अनेकांनी हे व्हीडिओज पाहिलेही असतील. पण पुन्हा बघा... अन आयुष्यभर लक्षात ठेवा. http://www.mumbaihangout.org/index.php?option=com_content&task=view&id=3811

अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन -

अमोल केळकर ·
लेखनविषय:
श्री दत्त ज्योतिष विद्यालय, मुंबई यांच्या विद्यमाने दादर येथे रविवार दि. २४ जानेवारी २०१० रोजी ' ज्योतिष -अध्यात्म व साधना ' या विषयावर एक दिवसाचे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. सदर अधिवेशनामध्ये खालील मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. १) रामायण व महाभारतकालीन ग्रहस्थिती - डॉ. प. वि. वर्तक २) ज्योतिष व साधना - विद्या वाचस्पती, श्री. आदिनाथ साळवी ३) कर्म सिध्दांत व नियतीचे संकेत - श्री. विजय हजारी ४) ज्योतिष व अंधश्रध्दा निर्मुलन - श्री.

२६ नोव्हेंबर विसरायचा नसेल तर आवर्जून पहावं असं काही

बहुगुणी ·
लेखनविषय:
भष्टाचाराविरूद्ध महत्वाचे हत्यार ठरू शकणार्‍या माहिती आधिकाराच्या कायद्यानंतर त्याच्या काही यश-कथा वाचल्या, तसंच हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे यांच्या अतिरेक्यांद्वारा हत्येनंतर त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट विषयीच्या चौकशीला मिळालेलं असं बेजबाबदार उत्तरही वाचनात आलं.

...आणि `गोठलेल्या' अश्रूंना पुन्हा वाट फुटली!!

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून "जीपीओ'कडील रस्त्याने बाहेर पडणारी गर्दी आज नेहमीसारखी "वाहत' नव्हती. या दिशेने बाहेर पडणाऱ्या आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पावले आज थबकत होती... आणि मूक होऊन पुढे सरकत होती. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला याच रेल्वेस्थानकावर अतिरेक्‍यांनी अंदाधुंद गोळीबार करीत पहिला उच्छाद मांडला आणि नंतर अवघ्या मुंबईला वेठीस धरले. आज या स्थानकावर पाय ठेवणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच "त्या' दिवसाच्या आठवणींचा वेढा पडलेला असतानाच, स्थानकाबाहेरच्या रस्त्यावरचे छायाचित्रांचे प्रदर्शन अंतर्मुख करीत होते.

प्रिझनर्स डिलेमा

अजय भागवत ·
मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू. "प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात.

तुझे निरंतर चित्र काढतो...

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
....महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रंगविलेले पाच वर्षांनंतरच्या महाराष्ट्राचे एक रम्य चित्र- गरीबांसाठी दहा लाख घरे, गावागावाला डांबरी रस्ते, मुलामुलींना मोफत शिक्षण, जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफडी करून स्त्री भृणह्त्या रोखणार (?), ६५ वर्षावरील गरजू वृद्धाना आजीवन ६०० रुपये पेन्शन, गरीबांना ३ रुपय किलो दराने धान्य = सुजल महाराष्ट्र, सुफल महाराष्ट्र!!! (या स्वप्नाचे कात्रण काढून ते जपून ठेवावे काय?

`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
`वादळ' आणि `वादळग्रस्त'... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली मने `नवनिर्माणा'च्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक हवामान बदलून गेले.

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

विकास ·
मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती.