Skip to main content

माध्यमवेध

पण शाहरूख खान ने एक चूक केली

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 11/02/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच). गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला.

सर्वच राजकीय पक्षांचा निषेध

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 05/02/2010 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस. गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच.

स्टार माझावर पाहा ’ब्लॉग माझा’चा पारितोषिक वितरण समारंभ !

लेखक देवदत्त यांनी रविवार, 31/01/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
हरभर्‍याच्या झाडावर चढून एक घोषणा: आत्ताच आलेल्या दूरध्वनी आणि विपत्रावरून असे समजले की आज (३१ जाने. २०१०) रात्री ९:३० वाजता स्टार माझावर ह्या पारितोषिक वितरणाचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे. पहायला विसरू नका. :)

पिक्चरच्या xxx घो

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 18/01/2010 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वन बॉल टू गो अ‍ॅन्ड फोर रन्स टू विन !! इति हंपायर उवाच सामना जिंकायला ४ धावा मात्र सिनेमातल्या हिरोचे शतक पुर्ण व्हायला पाहिजेत ६ धावा. उत्सूकता आहे ती आपला तेंडल्या शतक करतो का नाही याची ! संघाचा विजय झाला काय आणि नाही झाला काय ? प्रत्येक जण आता काय होणार या उत्सूकतेने नख खात आहेत. पण शिनिमाचा हिरो तेंडूलकर ( मियांदाद म्हणायला पाहिजे काय त्याला ?) मात्र अपेक्षेप्रमाणे आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुढे सरसावत सिक्सर मारतो ती ही एवढ्या जोरात की सांताक्रुज विमानतळावरुन नुकतंच उड्डान केलेले जेट विमान थोडक्यात बचावते.

या निर्दय मंत्र्यांचा धिक्कार!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 08/01/2010 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आताच माणुसकीला काळिमा लावणार्‍या या दोन तामिळी मंत्र्याच्या या घृणास्पद वर्तनाविषयी वाचलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून चंदनचोर वीरप्पनला ठार मारणार्‍या सब इन्स्पेक्टर आर वेत्रवेल्ली याला सात स्मगलर्स नी भर रस्त्यात हल्ला करून त्याचे दोन्ही पाय तोडलेले असतांना, पाठोपाठ आपल्या लवाजम्यासहित घटनास्थळी पोहोचलेल्या तामीळनाडूचे आरोग्य मंत्री एम आर के पनीरसेल्वम आणि युवक आणि क्रीडा मंत्री मोइद्दीन खान या दोघांनी कसलीही मदत न केल्याने वेत्रवेली अति रक्तस्त

पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला..आज श्रीनगरमध्ये

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 06/01/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
अतिरेक्यांनी श्रीनगरच्या एका मध्यवर्ती हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड हल्ला केला आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार एक पोलिस कर्मचारी बळी पडला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. शंभरावर लोकांना हॉटेलातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चकमक अजूनही चालू आहे. जम्मू-काश्मीर सरकारला कालच एक वर्ष पूर्ण झालं तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेत वाढ झाल्याचं सांगितलं होतं. त्याला अतिरेक्यांचं हे उत्तर आहे.

नाताळच्या सुट्टीत मुलांना (आणि त्याबरोबर पालकांना) बघायला आवडतील अशी संस्थळे

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 25/12/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्यातील एक-दोन संस्थळे आज पाहिली तेव्हा उघडत नव्हती..पण नंतर उघडून पहावीत.]

`स्टोरी'चं `नवं पान'...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 18/12/2009 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं अस्तित्व `आपल्या जगा'पासून केव्हाच वेगळं झालंय...36 वर्षांपूर्वी जिवंतपणाच्या सगळ्या संवेदना हरवलेली अरुणा शानभाग सध्या पुन्हा चर्चेत आली असली, तरी त्या चर्चेचे वारे तिच्या आसपासदेखील पोचलेले नाही... `ती जिवंत आहे', एवढंच `केईएम'चे वैद्यकीय अधिकारी सांगतात. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने तिचं एकटेपण आणखी `कडेकोट' झालं आहे... `केईएम'च्या एका निर्जन कोपऱ्यातल्या `बेड'वर एकाकीपणे तिची देखभाल करणारे कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाचे अतिवरिष्ठ अधिकारी वगळता, अन्य अनेकांना ती कुठे आहे हे माहीतदेखील नाही...

क्रिकेट आणि बिझनेस - हर्षा भोगले

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 15/12/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षा भोगले हे आपल्याला सर्वांनाच एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून माहिती आहेतच. आपल्याला हे देखील माहिती आहे की ते IIM Ahmedabad चे माजी विद्यार्थी. तेव्हा क्रिकेट इतकाच व्यवस्थापन क्षेत्र हा त्यांचा अधिकाराचा विषय. आपल्या सुदैवानी त्यांनी ह्या दोन्ही गोष्टींमधल्या साधर्म्यावर लिहायचं ठरवलं आहे ! http://www.ceolessonsfromcricket.com/index.asp ह्यावर ह्यापुढे आपल्या क्रिकेट आणि व्यवस्थापन, नेतृत्त्व, संघबांधणी इत्यादींबद्दल बरेच वाचायला मिळेल !

जन्मोजन्मी

लेखक हेरंब यांनी रविवार, 13/12/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाला पुनर्जन्माबद्दल कुतुहल असतेच. मीही त्याला अपवाद नाही. मुले मोठी झाल्यावर, मी जेंव्हा निरवानिरवीच्या गोष्टी सुरू केल्या,. तेंव्हा एकदा माझी मुलगी मला म्हणाली होती,' बाबा, तुला मरायची एवढी घाई का ?" त्यावर मी उत्तर दिले की मला पलिकडे काय आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. त्यातून मी आता माझ्या जबाबदार्‍यांतून मोकळा झालो आहे. आणि स्वतः मेल्याशिवाय सत्य काय आहे हे कसे कळणार? पण आत्महत्या हा मार्ग काही योग्य वाटत नव्हता. अचानक जिवंतपणीच ते जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध झाली. नुकत्याच एका वाहिनीवर तुमचा पूर्वीचा जन्म जाणून घेण्याविषयी एक कार्यक्रम सुरू झाला.