२६ नोव्हेंबर विसरायचा नसेल तर आवर्जून पहावं असं काही
भष्टाचाराविरूद्ध महत्वाचे हत्यार ठरू शकणार्या माहिती आधिकाराच्या कायद्यानंतर त्याच्या काही यश-कथा वाचल्या, तसंच हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे यांच्या अतिरेक्यांद्वारा हत्येनंतर त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट विषयीच्या चौकशीला मिळालेलं असं बेजबाबदार उत्तरही वाचनात आलं.
तरीही लोकांनीच ही चळवळ जिवंत ठेवली पाहिजे, आणि मिपा सारखे लोकप्रिय ब्लॉग्ज या संदर्भात महत्वाची भुमिका वटवू शकतात असं वाटतं म्हणून फारसा गाजावाजा न करता सुरू झालेल्या एका महत्वाच्या घडामोडीकडे लक्ष वेधायचा हा प्रयत्न आहे.
आर टी आय इंडिया डॉट ऑर्ग या संस्थळावर / फोरम वर आपण success stories वाचू शकता, तसंच कित्येक चौकश्यांचा पाठपुरावा करू शकता.
या संघटनेने चालू केलेल्या आर टी आय व्हिडीओ कम्युनिटी वर या संदर्भातील व्हिडीओज् देखील अपलोड करू शकता.
माझं खास recommendation: लोकनाद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेला हा व्हिडीओ जरूर पहा!
वर्गीकरण
आर टी आय हे
माहितीबद्
बहुगुणी
अधिकृत संकेतस्थळ
खूप छान
चांगली आणि उपयोगी माहिती
धन्यवाद!! च
उत्तम
माहितीबद्
बहुगुणीजी