Skip to main content

माध्यमवेध

पुरुषप्रधान मालिका : थूंकू

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 09/10/2009 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले अनेक दिवस (विषेशतः हापिसातून घरी गेल्यावर) डोक्याला शॉट लावणार्‍या आणि महिलांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या अनेक मालिकांचे रतिब विविध वाहीन्या घालत असतात. पूर्वी सास-बहूच्या मालिकांचे रतिब हिंदी वाहीन्या घालत असत (हुश्श तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती). तर सांगण्याचा मुद्दा हा कि या भयंकर कंटाळवाण्या मालिका घरी गेल्यावर सोसाव्या लागतात. अगदी आतल्या खोलीत जाऊन काही वाचन करावे म्हटले तरी आजूबाजूच्या घरातून येणारा असल्याच मालिकांचा आवाज आणि त्यांचे पार्श्वसंगीत यामुळे डोके उठते. त्यामुळे कधी कधी बा**ला हापिसात बसून काम करत सडलेले बरे असे वाटून जाते.

मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश(सीडी आवृत्ती) : एक अवलोकन

लेखक देवदत्त यांनी रविवार, 04/10/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्रित केले. "दादर मधील आयडियल बुक डेपो". तिकडुन ह्याची सीडी घरी आणण्यात आली.

खरंतर ह्या त्यांच्या संकेतस्थळावर ह्या सीडी शब्दकोशाची विस्तृत माहिती दिलेली आहेच. तरीही मला जसे दिसले ते मी येथे लिहीत आहे.

दशावतार

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 28/09/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले. सूरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अ‍ॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो.

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

कुरुंदवाडचा अनोखा गणेशोत्सव..!

लेखक सुहास यांनी बुधवार, 09/09/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दंगलींच्या आगीत सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरे होरपळत असताना कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाबद्द्लची दूरदर्शनवरची बातमी आठवली. मिरजेपासून २०-२५ किमी अंतरावर असलेल्या या गावात गेली ६० वर्षे पाच मशिदींमध्ये गणपती बसवला जातो. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे जे सण (मोहरम, रमजान ईद) या काळात येतात ते या मंडळांतर्फे साजरे केले जातात. इथल्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूच जास्त जात असतील..! आंतरजालावर चित्रफित शोधली, पण मिळाली नाही..

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

लेखक भोचक यांनी गुरुवार, 03/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एक टरकावणारा अनुभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 28/07/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.