ट्रॉय
ट्रॉय खरतर एक शोकांतीका म्हणावी का शौर्य कथा असा प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे. हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय अनुभवांपैकी एक असा अनुभव. हा चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक न राहता ह्या कथेतील एक पात्र बनुन जातो. आपण चित्रपट पाहात नसुन जणु ह्यातील मुख्य व्यक्तीरेखांच्या आजुबाजुला घुटमळतोय असे वाटत राहते.
हि कथा खरे तर स्पार्टाची सौंदर्यवती राणी हेलन आणी तिच्या प्रेमात आकंठ बुडुन तिला पळवुन नेणार्या ट्रोजन राजकुमार पॅरीसची प्रेमकहाणी, पण चित्रपटाचे (खरेतर ह्या कथेचे) मुळ नायक बनुन जातात ते पॅरीसचा मोठा भाऊ हेक्टर आणी फक्त स्वपराक्रमाने आपले नाव अजरामर व्हावे ह्या इच्छेने पछाडलेला समुद्रदेवता थेटीसचा पराक्रमी पुत्र अकिलीज.
एरीक बाना हा अभिनेता हेक्टर म्हणुन तर ब्रॅड पिट अकिलीज म्हणुन ह्या भुमीका अक्षरश: जगले आहेत. जसे आजही कर्ण म्हणले की पंकज धिर आठवतो तसेच अगदी ह्या दोघांच्या भुमीकांबरोबर घडते.
All my life I've lived by a code and the code is simple: honor the gods, love your woman and defend your country. Troy is mother to us all. Fight for her! म्हणणारा शुरवीर हेक्टर एका बाजुला आणी Myrmidons! My brothers of the sword! I would rather fight beside you than any army of thousands! Let no man forget how menacing we are, we are lions! Do you know what's waiting beyond that beach? Immortality! Take it! It's yours! म्हणणारा अजिंक्य अकिलीज एका बाजुला. ह्यांचा संग्राम हेच खरे ट्रॉयचे वैशीष्ठ्य.
ट्रॉयची कथा खरेतर अतिशय वळणावळणाची म्हणावी लागेल. दोन राज्यातील शांती स्थापन झाल्यावर स्पार्टाचा राजा मेनेलॉसचा पाहुणचार ट्रॉयचे राजपुत्र हेक्टर आणी पॅरीस उपभोगत असतात. ह्याच काळात पॅरीस स्पार्टाची सौंदर्यवती तरुण राणी हेलनच्या प्रेमात पडतो. वयस्क मेनेलॉसची राणी बनुन राहणारी हेलन देखील आपले हृदय पॅरीसला देऊन बसते. परतीच्या वाटेवर हेक्टरला आपल्या लहान भावाने प्रेमत आंधळे होऊन राणी हेलनला देखील आपल्या बरोबर पळवुन आणले आहे हे कळते. भावाच्या ह्या आंधळ्या कृत्याने ट्रॉयचा विनाश होईल हे ओळखुन तो जहाज परत वळवण्याचे आदेश देतो. कोवळ्या वयातला पॅरीस मात्र हेलन परत गेली तर मी पण तिच्या बरोबर जाईन आणी प्रेमात जीव गमावीन असा हट्ट धरुन बसतो. नाईलाजाने हेक्टर ट्रॉयच्या वाटेवर पुन्हा निघतो. ह्या वेळी हेक्टरच्या तोंडी एक अप्रतीम संवाद आहे, तो पॅरीसला म्हणतो "You say you're willing to die for love but you know nothing about dying and you know nothing about love!"
बंधुप्रेमापुढे शरणागती पत्करलेला हेक्टर ट्रॉयला परत आल्या आल्या आपल्या वडीलांना हेलनला परत पाठवुन द्यायची विनंती करतो, त्याला पुढचा अनर्थ टाळायचा असतो. परंतु राजा प्रायम मात्र तीचा सुन म्हणुन सहर्ष स्विकार करतो. ज्याची भिती हेक्टरला असते नेमके तेच घडते. हेलनला पळवल्याने संतप्त झालेला मेनेलॉस आपला महत्वाकांक्षी भाऊ अगॅमेनॉनच्या सह्हायाने ट्रॉयवर हल्ल्याची तयारी करतो. ह्या युद्धात ग्रीकांच्या बाजुने पुन्हा एकदा समर्थपणे उभा राहणार असतो तो म्हणजे अजिंक्य अकिलीज.
ह्यानंतर कथेला छानसा वेग मिळाला आहे. सगळेच सांगुन मजा घालवत नाही पण अकिलीजचे चिलखत घालुन लढणार्या अकिलीजच्या चुलतभावाला हेक्टर अकिलीज समजुन ठार करतो. सुडाने पेटलेला अकिलीज हेल्टरला आव्हान देतो. ह्या दोघांच्यातील अंतीम युद्ध म्हणजे उत्कंठेची परिसीमा आणी ह्या चित्रपटातील अत्युच्च क्षण म्हणावा लागेल.
अपोलो मंदीर एकहाती जिंकल्यानंतर अकिलीज आणी हेक्टर पहिल्यांदा समोरा समोर येतात तो प्रसंग कींवा एक विरुद्ध एक लढतीत अकिलीजने बोगॅरीसची केलेली हत्या हे प्रसंग तर अविस्मरणीयच.
एकदा तरी अनुभवावाच असा हा ग्रीक युद्धाचा आणी ग्रीक कथेचा प्रवास जरुर अनुभवा.
वाचने
13189
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
In reply to छान by दिपक
एरीक बाना संवेदनशील पण तितकाच लढाऊ हेक्टर अप्रतिमचअगदी असंच वाटलं होतं सिनेमा बघून. तसाही अकिलीजच्या बेमुर्वतपणा, पॅरीस आणि हेलनचा अल्लडपणा ह्यांच्यासमोर हेक्टरचा समंजसपणा गोष्टीतही भावला होताच. एरिक बानाने खरंच ती तगमग खूप सुंदर व्यक्त केली आहे. परा सुंदर परीक्षण! आता पुन्हा सिनेमा पहीन.
छान !
--अवलिया
छान.
परकुट्या तुला इंग्रजी समजते?
मोठी स्टार कास्ट असलेला सिनेमा.
फेस दॅट लॉन्च्ड थाउसंड शिप्स म्हणले जाणारी हेलनचे काम करणारी अभिनेत्री फारच मामुली पेश केली आहे असे वाटले. बाकी कलाकारांनी काम चोख केले आहे पण स्टोरी इतकी प्रभावी वाटली नाही खरी.
अकिलीजने बोगॅरीसची केलेली हत्या हा प्रसंग लै भारी.
जाताजाता - शेखर कपूरने दिग्दर्शीत केलेला "एलीझाबेथ - द गोल्डन इयर्स" (नवा २००७ सालचा जुना १९९८ नव्हे) छान आहे खरा. इंग्रज, स्पॅनिश लोकांचा रक्तरंजीत राजकारण इतिहास, धर्मसत्ता-राजकारणात असहाय परिस्थीतीची गुलाम इलिझाबेथ, घडत गेलेले प्रसंग व बनलेला इतिहास फार छान दाखवले आहे.
In reply to सही. by सहज
पण स्टोरी इतकी प्रभावी वाटली नाही खरी.खरं तर मला ऐतिहासीक सिनेमे आवडतात पण ट्रॉय काही फारसा आवडला नाही. अकीलीजचे केलेले अविश्वसनीय उद्दात्तीकरण, स्टीक्स या मायावी नदित बुडवल्यमुळे तो जरी अजिंक्य योध्या असला तरी सुद्धा त्याचा वावर (ब्रॅड पीट जरा अतीच करतो त्यामुळे असेल) मात्र तसा वाटत नाही. 'मायथॉलॉजीकल कथा असल्यामुळे काही प्रसंग 'काहीच्या काही' असले तरी ते चांगल्या प्रकारे चित्रीत करता आले असते असे वाटते.
ट्रॉय , ३०० , ग्लॅडियेटर .... अल्टिमेट मुव्हीज .. कधीही आणि कितीही वेळा पहा .. बोर नाही होत .. आपल्या कडे एक जोधा अकबर का कोणता तरी फालतू सिनेमा आला होता .. त्यात काही ट्रॉय मधले ढापलेले सिन्स जश्शेच्या तश्शे टाकले होते.
असो .. पर्या मस्तंच लेख आहे रे ..
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर लिही एकदा .. च्यामायला ८ वेळा पाहुन पण काही पुर्ण कळलाय असं वाटत नाही ,,, तरीही आवडतो तो चित्रपट
In reply to ट्रॉय , ३०० by टारझन
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर लिहीच परा.
चांगली माहिती मिळाली. अशी माहिती न वाचता इंग्रजी पिक्चर बघायला गेलो तर काही कळत नाही. माहिती वाचून सिनेमा काय आहे ते कळेल.
धन्यवाद
अमोल
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
मस्त रे परा.. छान परिक्षण केलयस... वर नमुद केल्या परमाणे.. ट्रॉय, ३००, ग्लॅडीएटर या चित्रपटांना तोड नाही.
असे चित्रपट एकदा बघुन मन भरतच नाही.
चित्रपट चांगला आहे.. नवरोबाचा आवडता .. टिपीकल 'गाय' मूव्हि.. पण तरीहि आवडला..
सुंदर! परिक्षण खूप आवडलं. मागे एकदा अर्धवट पाहिला होता हा सिनेमा. वेळ काढून पूर्ण पाहिन आता.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
बघिन म्हणतो हा चित्रपट.
छान परिक्षण! हेलनची कथा नेहमीच भुरळ पाडत आली. चित्रपट मात्र फारसा आवडला नव्हता.
प्रा धन्यवाद, सुंदर विवेचनाबद्दल.
केवळ अप्रतिम चित्रपट, माझ्या आवडत्यांपैकी एक.
हेक्टरची भुमिका अकीलीजपेक्षा उजवी वाटते. अकीलीज अतिउद्दात्तीकरण केले गेले आहे.
माझा फेवरीट चित्रपट. सगळे युद्ध प्रसंग तर केवळ अप्रतीम चित्रीत केलेत.
छान परिक्षण
परिक्षण लिहेलेल्या २ वाक्यांव्यतीरीक्त अजून २ वाक्य फार आवडतात, १ म्हणजे मेनेलॉस सुरवातीला टोस्ट करताना म्हणतो-
"may the gods keep wolves in the hills and women in our beds"
आणी तो १ ग्रीक राजा अकीलीज ला म्हणतो
"in war young men die and old men talk"
एरीक बाना चा अभिनय ब्रड पिट पेक्शा उजवा वाट्तो.
सुजय
मस्त रे परा...
अजुन येवुदेत.
--टुकुल
... एका मित्राकडे आहे हा चित्रपट. त्यामुळे लवकरच बघायचा योग येईल असे दोसते आहे. ;)
बिपिन कार्यकर्ते
छान लिहले आहेस...
स्पार्टाची सौंदर्यवती राणी हेलनला पाहण्यासाठी तरी एकदा हा चित्रपट पाहावा म्हणतो... ;)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
ल्हान्पणी पाहिलेला हेलन ओफ ट्रोय सिनेमा आठवतो..खुप छान वाटला लहान्पणी
लाकडी घोडा त्यात लपलेले सैनिक..सार अदभुत वाटले त्या वयात...


From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन " alt="" />

ठीकठाक आहे चित्रपट. अगदीच काही कौतुकाचा नाही.
In reply to ठीकठाक आहे by घाटावरचे भट
इतका खास नाही वाटला चित्रपट...मात्र पर्या रावांचे समीक्षण वाचायला आवडले..
:-)
बैलोबा (हॉलीवूडकर )!!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
छान आढावा आहे रे पर्या चित्रपटाचा...
एरिक बाना चा अभिनय उत्तम..त्याने ब्लॅक हॉक डाउन मधे पण धमाल केलीय..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सुरेखच चित्रपट होता हा. पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे ईलियड आणि ओडीसी या दोन्ही महाकाव्याचा जो खरा नायक आहे त्या युलीसिसच्या पात्राला चित्रपटात खुपच कमी वाव देण्यात आलेला आहे. अर्थात एरिक बाना आणि ब्रॅड पीट सारखे दिग्गज असल्याने ते जाणवूनही येत नाही म्हणा.
अकिलीसचा कमालीचा थंडपणा आणि युद्धक्षेत्रावर आल्यावर मात्र त्याचे बदलणारे रौद्र रुप दोन्ही ब्रॅड पीट समर्थपणे दाखवतो.
मला मात्र यापेक्षा तरीही '३०० मेन' जास्त आवडला होता.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
पा ही न एकदातरी ...
सू हा स...
छान परिक्षण.
मला खुप आवडतो हा चित्रपट.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
मस्त लिहीलेय. दुसरा फोटू जबरा हाय.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
पण ब्रॅड पिट पेक्षा नानाचा जहाजावरील रोल अप्रतिम. ग्रीसच्या महालातील अनुपम खेर आणि परेश रावल ह्यांची अभिनयातील जुगलबंदी लक्षात राहते. आयटम साँग नसल्यामुळे थोडा रुक्ष व मिळमिळीत वाटतो पण मल्लिकाचे कवि संमेलन थोडासा दिलासा देऊन जाते.
छान