मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद ·
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_borase.pdf येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

हळदीघाटातील रण संग्राम ई-पुस्तक विमोचन

योगविवेक ·
बर्‍याच काळानंतर घागा लिहित आहे. त्याला कारण ही मजबूत आहे. विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे. इंग्रजी पुस्तकाचे लोकार्पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दि १८ जून (कारण याच तारखेला ते युद्ध घडले होते) रोजी सकाळी ११ वाजता होईल. हिंदी मधील ईपुस्तक लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते १८ जून रोजी सायंकाळी ६.३० ला होणार आहे. तर मराठीतील पुस्तकाचे लोकार्पण मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते १८ जून रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.

दिठी- एक अनुभूती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

दिठी, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणा-या सुखदु;खाची गाथा सांगणारी एक छोटीशी गोष्ट. अतिशय तरल, सुंदर, भावनांचा कल्लोळ, मनात निर्माण होणारे असंख्य विचार, सतत हिंदकळत राहावेत अशी एक उत्तम कलाकृती. एखादी सुंदर कथा, कादंबरी, वाचून झाल्यानंतर किंवा एखादं गाणं डोळे मिटून ऐकत राहावे, पुस्तक छातीवर उपडं करून त्या कथेत, संगीत मैफलीत रमून जावे त्यातून बाहेर पडूच नये असा आनंद देणारी कथा म्हणजे 'दिठी' मराठी चित्रपट.

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

माहितगार ·
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

स्कीप इन्ट्रो

सुरिया ·
कोरोनाने काय दिले? लॉकडाउनात सक्तीने घरी बसायची सजा आणि त्या सजेला सुसह्य करण्यासाठी दिले ओटीटीचे सर्व प्रकारच्या मनोरंजनाने खच्चून भरलेले तास. अर्थात ओटीटी करोनाच्या आधीच घरात आलेला जरी असला तरी कोरोनापूर्व आणी कोरोनाच्या काळातील ओटीटीवर खर्च झालेला वेळ ह्याचे गुणोत्तर ह्याच कालावधीतल्या फरसाणच्या खपातही असणार असा एक प्राथमिक अंदाज आहे. ज्या गोष्टी बाहेर उंडगून साजर्‍या सॉरी...सेलिब्रेट केल्या जायच्या त्या घरच्या घरी कराव्या लागल्या ना. असो..

सध्या मी काय पाहतोय ? भाग ४

मदनबाण ·
स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले. ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला...

मामलेदार नावाचं गारूड

सर्वसाक्षी ·
काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली. या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण. बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच. काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच. आमंत्रण हे त्याचं जरा कौटुंबिक सामाजिक रूप.

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखनवाला ·
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले: