मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

मार्गी ·
✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं! ✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती" ✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद" ✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं! ✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं ✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत? नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला.

अपघात टळला तो प्रवास

पराग१२२६३ ·
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट - २१ डिसेम्बर आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस

चामुंडराय ·
संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आज रोजी Winter/December Solstice म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ होत असलेला २१ डिसेम्बर हा दिवस "आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस" म्हणून साजरा करायला मान्यता दिली आहे. २१ जूनच्या "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ह्या यशानंतर भारताने आणखी एक यश मिळवले आहे. योगानंतर "ध्यान" हि भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट (cultural export gift) आहे. प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

उस्ताद झाकीर हुसेन. एक आठवण

नीलकंठ देशमुख ·
उस्ताद झाकीर हुसेन.   अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी  झाकीर हुसेन यांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पहिल्यांदा पाहिले.अत्यंत आकर्षक  व्यक्तीमत्व असलेले झाकीर म्हणजे प्रचंड उत्साह ,आणि चैतन्य.ते मंचावर  एकटे येत नसत .त्यांचा श्वासच जणू असलेला 'जीवलग 'तबला' दोन्ही हातात असे. त्यांच्या साठी ती निर्जीव वस्तू नव्हती.ते होते त्यांचे आराध्य दैवत! झाकीर भाई येण्याची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट सुरू होई तो थांबतच नसे.त्या स्वागताचा स्विकार करताना तेही श्रोत्यांना अभिवादन करत मंचावरच्या त्यांच्या अस्तित्वाने सगळे वातावरण भारून जात असे.

वावटळ

सुजित जाधव ·
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

टर्मीनेटर ·

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.

ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

मार्गी ·
सर्वांना नमस्कार. नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे.

महाराष्ट्र माझा

नीलकंठ देशमुख ·
महाराष्ट्र माझा..' आहाहा!ज्या दिवसांची या महान राकट कणखर महाराष्ट्र देशातील कमीजास्त अंदाजे नवू कोटी जनता (सगळे लाडके लहान थोर धरुन) आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आता उजाडला च नाही तर चक्क भरदुपार झाली आहे.आता भर दुपार म्हणलं की चटके बसणारच! आणखीही बसतील,पण फिकीर कुणाला अन् कशाला?आता एवढे सगळे छान छान होत आहे,होणार आहे तर अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष या राकट कणखर महाराष्ट्रातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)कशाला देईल?