Skip to main content

वावटळ

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 12/12/2024 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 05/12/2024 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.

पानगळीचा रंगोत्सव

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 01/12/2024 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
1p 2p इस रंग बदलती दुनिया मे ... २१ जून रोजी मध्यान्ही सूर्य कर्कवृत्तावर (Tropic of Cancer)

ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/11/2024 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे.

महाराष्ट्र माझा

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 13/11/2024 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र माझा..' आहाहा!ज्या दिवसांची या महान राकट कणखर महाराष्ट्र देशातील कमीजास्त अंदाजे नवू कोटी जनता (सगळे लाडके लहान थोर धरुन) आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आता उजाडला च नाही तर चक्क भरदुपार झाली आहे.आता भर दुपार म्हणलं की चटके बसणारच! आणखीही बसतील,पण फिकीर कुणाला अन् कशाला?आता एवढे सगळे छान छान होत आहे,होणार आहे तर अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष या राकट कणखर महाराष्ट्रातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)कशाला देईल?

दहीभात...

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 12/11/2024 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

तुंग- तिकोनाजवळच्या अंजनवेलमधील आकाश दर्शनाचा सोहळा!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 06/11/2024 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशातला प्रकाशाचा उत्सव! ✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं! ✪ अंधार्‍या आकाशात तार्‍यांची उधळण ✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार ✪ आकाशात तार्‍यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस ✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती ✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्‍या बेडसा लेण्या! ✪ Anjanvel- the week-end spent well! नमस्कार. नुकताच आकाशातल्या प्रकाशाच्या उत्सवाचा अनुभव घेता आला. पवना धरणाच्या परिसरात व तुंग- तिकोना किल्ल्यांमध्ये असलेल्या अंजनवेल कृषि पर्यटनच्या सुंदर ठिकाणी आकाश दर्शनाचा आनंद घेता आला व इतरांसोबत शेअरही करता आला. त्या अनुभवाचं हे वर्णन.

स्वप्नं हे जुलमी गडे !

लेखक देवू यांनी मंगळवार, 29/10/2024 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस-रात्र मेंदूचा कितीही वापर केला तरी मेंदू थकत नसतो. मेंदूला आराम मिळावा म्हणून आपण झोप घेतो, खरं तर तेव्हाही मेंदू आराम घेत नसतो, आपल्याला स्वप्नं. दाखवायचे काम करत असतो. आपली इच्छा असो वा नसो झोपेतही मेंदू आपली करमणूक करत असतो. कुठलीही वर्गणी न भरता रात्रभरात त्याच्या ओटीटी व्यासपीठावरून तुमची इच्छा असो वा नसो , पाच ते सहा स्वप्नमालीका दाखवतोच दाखवतो. त्यातही विविधता असते.

केशर : गाथा आणि दंतकथा - ३ (ग्रीस)

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 18/10/2024 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
Greece The Love of Crocus and Smilax ह्या ग्रीक दंतकथेचे मराठीत शब्दांकन: कोणे एके काळी ग्रीस मध्ये 'क्रोकस' नावाचा देखणा तरुण आणि 'स्मिलॅक्स' नावाची एक अप्सरा एकमेकांच्या प्रेमात पडले होते.